कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धाजंली
कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धाजंली
कन्हान : – भारतरत्न स्वर सम्राज्ञी, देशाची गायन कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांच नुकतचं निधन होऊन वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा या निधना नंतर संपुर्ण देशात शोकमय वातावरण निर्माण झाल्याने गांधी चौक कन्हान येथे शहर विकास मंच पदाधिका-यांनी स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दोन मिनटाचे मौन धारण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
स्वर्गीय लता मंगेशकर यांना कोरोना ची लागण झाल्याने त्यांना उपचाराकरिता ब्रीच कँडी रुग्णालयात भर्ती केले होते. उपचार सुरू असतांना त्यांच्या प्रकृती त सुधारणा झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासुन त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यानी रूग्णालयात दाखल केल्यावर रविवार सकाळी ८ वाजुन १२ मिनटां नी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्वर्गी य लता मंगेशकर यांच्या निधना नंतर संपुर्ण देशात शोकमय वातावरण निर्माण झाल्याने गांधी चौक कन्हा न येथे शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून मंच मार्गदर्शक प्रभाकर रूंघे यांच्या हस्ते स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्व मंच पदाधिका-यांनी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दोन मिनटाचे मौनधारण करून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विका स मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मंच मार्ग दर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे, सहसचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सदस्य प्रकाश कुर्वे, चंदन मेश्राम सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535