कन्हान पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिवस थाटात साजरा
कन्हान : – जागतिक महिला दिवसा निमित्य पोलीस स्टेशन कन्हान व्दारे हनुमान मंदिर परिसर गांधी चौक येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार माल्या र्पण व विनम्र अभिवादन करून महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत, सन्मानित करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.८) मार्च जागतिक महिला दिवसा निमित्य कन्हान पोलीस स्टेशन द्वारे हनुमान मंदिर परि सर गांधी चौक येथे कन्हान पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या अध्यक्षेत व नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, पोउपनि सौ नंदा पाटील, अँड जोशिला उके आदीच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां च्या प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण व विन्रम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी कन्हान पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस अधिकारी नंदा पाटील, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांनी महिलांचे समाजातील महत्व, सबलीकरण याविषयी मार्गदर्शन केले. सखी मंच अध्यक्ष नितु तिवारी, ममता दास यांनी सुंदर गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमास उपस्थि त सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आ ले. सर्वाना अल्पोहार वितरित करून जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मनिषा चिखले, उषा पोटभरे, लीना हारोडे, शुभांगी घोगले, इंद्रा कुर्मी, वैशाली बेलनकर, वैशाली थोरात, माया तितरमारे, किरण गजभिये, सरिता कुर्वे, प्रियंका सलामे, स्मिता पाटिल, लता लुढेंरे, हर्षाली भनारकर सह कन्हान पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कर्मचारी बहु संख्येत उपस्थित होत्या.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147