महिला व बाल रूग्णालयात शासनाच्या आदेशानुसर कारगार पुरवठ्याचे काम

गडचिरोली प्रतिनिधी : दिनांक 21/12/2020
केंद्रीय खरेदी समिती सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांच्या कार्यारंभ सभेच्या प्राप्त मंजूरी प्रमाणे ई-निविदेच्या अटी व शर्तीचे अधिन राहुन जिल्हा महिला व बाल रूग्णालयात कंत्राटी पध्दतीने कुशल व अकुशल कामगारांचे 29 पदे पुरवठा करण्याचे आदेश औरंगाबाद येथील मे ॲकुरेक्स सर्व्हिसेस प्रा.लि. ला देण्यात आले. यात जिल्हा शल्यचिकीत्सकांचा काही हस्तक्षेप नसतांनाही जन प्रतिनिधीनी कुठलीही पडताळणी न करता खोट्या आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे मत बहुजन आघाडीचे नागपूर विभागाचे सहसचिव प्रा. आनंद मेश्राम यांनी व्यक्त केले आहेत.
गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात मागील 3 वर्षापासून रोजनदारी पध्दतीने 29 कामगार कार्यरत होते. हि पदे भरतांना संबंधित अधिक्षक डॉ. दिपचंद सोयाम यांना वरिष्ठांनकडून कोठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. इतकेच नव्हे तर कार्यरत कामगारांना लेखी आदेशही दिले नाही. शासन ई-निविदे प्रमाणे औरगाबाद येथील कंपनीला कामगार पुरवठ्याचे आदेश मिळाल्याने कामगारांचा पुरवठा करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे जिल्हा चिकित्सकांवर अश्याप्रकारचे खोटे आरोप लावणे चुकीचेही असल्याचे मतही प्रा. आनंद मेश्राम यांनी व्यक्त केला. रोजनदारी कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचा अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना नसल्याने त्यांच्यावर खोटे आरोप लावणे चुकीचे आहे.
शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या निविदा निकाली काढल्यानंतर महाराष्ट शासनाने ऑउट सोरसिंग एजन्सीच्या मार्फतीने 29 पदे भरण्याचे आदेश दिले. मागील 3 वर्षापासून सेवा देणाऱ्या कामगारांना पुर्ववत सेवेत घ्यायचे कि नाही यांचे पुर्ण अधिकार सदर कंपनीला आहेत. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना जबाबदार धरणे योग्य नाही. असे मत ही प्रा. आनंद मेश्राम यांनी व्यक्त केले आहेत.