पोलीसांचा कारणामा ड्युटी संपल्यावर उरलेल्या वेळात लूट :35लाखांचे दागिने घेऊन फरार
गोरखपूर: सराफा व्यापाऱ्यांकडून ३५ लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गोरखपूर पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.गोरखपूरमध्ये पोलिसांनीच लूटमार केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती डीआयजी जोगिंदर कुमार यांनी दिली. ‘बस्ती जिल्ह्यातल्या पुरानी बस्ती पोलीस ठाण्यात तैनात असलेले आणि गोरखपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकरीगंजमध्ये राहणारे उपनिरीक्षक धर्मेंद्र यादव यांना लूट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेच या टोळीचे प्रमुख आहेत. याशिवाय मऊ जिल्ह्यातल्या डीह गावात राहणारे शिपाई महेंद्र यादव आणि गाजीपूर जिल्ह्यातल्या जंगीपूरमध्ये वास्तव्यास असलेले शिपाई संतोष यादव यांना अटक करण्यात आली आहे,’ असं कुमार यांनी सांगितलं
✍️प्रशांत जाधव
नवी मुंबई न्युज रिपोटर
9819501991