महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी १ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २३ : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी 1 जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तो पर्यंत खरीत पिकांचा पेरणी आणि जमीन मशामगतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलै पुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्या 24 जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बिया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 1 जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे. मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याबाबत कृषी संचालक विकास पाटील यांनी सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

केरोसिनचे सुधारित दर जाहिर

मुंबई, दि.२३ : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून केरोसिनचे दरासंदर्भात माहिती नुकतीच प्रसिद्ध…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

होलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे • होलार समाजाच्या प्रतिनिधींसमवेत विविध प्रश्नांबाबत झाली बैठक ; बार्टीने नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना

मुंबई, दि.२३ : होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत • स्व.आर. आर.पाटील (आबा) यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी समाधानकारक असल्याची भावना

मुंबई, दि.२३ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिली असून  उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी,…

चन्द्रपुर देश हेडलाइन

बहुजन समाज पार्टी द्वारा राजर्षि शाहु महाराज जयंती का आयोजन

बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर कि ओर से महापुरुषो के विचार, चिंतण, आंदोलन निरंतर बहुजन समाज तक पहुचाने हेतु विभिन्न…

महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

मूल येथे आरक्षण कृती समितीची सभा संपन्न

संविधान हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरूध्द, समस्त अ.जाती, अ.जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, एमबीसी व ओबीसी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या व कामगारांच्या…

महाराष्ट्र मुंबई शिक्षण हेडलाइन

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांच्या सूचना विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क) समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि. २३ : कोरोनाचा पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्क संदर्भात विद्यार्थी, पालक संघटनाकडून  शासनाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू…