⚫ लहान भावाच्या डोळ्यादेखत मोठ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू ⚫ ⚫ गुमगाव येथील हृदय द्रावक घटना ⚫
🔳 वर्धा, जिल्हा प्रतिनिधी : आर्वी , तलावातील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा त्याच्या लहान भावा च्या डोळ्या देखत पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही हृदय द्रावक घटना आर्वी तालुक्यातील गुमगाव येथे घडली
सुशील उर्फ आकाश वसंत गवळी (25) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार
आकाश गवळी आणि त्याचा लहानभाऊ महेश गवळी हे दोघे लहादेवी जंगलात इंधन गोळा करण्यासाठी गेले होते. इंधन गोळा झाल्यावर अंबाझरी तलाव परिसरात असलेल्या झाडाखाली दोघांनीही जेवण केलं, जेवण झाल्यावर आकाश आंगोळी साठी तलावात उतरला . मात्र थोड्याच वेळात त्याने गटांगळ्या खाणे सुरू केले. हा प्रकार लहानभाऊ महेशला दिसताच त्याने पाण्यात उतरून आकाशला वाचवण्याचा खूप आटापिटा केला . त्याचे वस्त्र पकडले , पण तो पाण्यात बुडाला नि परत वर आलाच नाही.
आर्वी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र तलावाच्या गाळात मृतदेह फसल्याने मृतदेह तलावा बाहेर काढण्यास अडचण झाली . दरम्यान भोई समाजातील लोकांना बोलावून मृतदेह तलावबाहेर काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिने करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी ,वडील आणि भाऊ आहे.
🔘 पोलीस योद्धा वृत्त सेवा 🔘
🔘महेश देवशोध (राठोड)🔘
🔘वर्धा, जिल्हा प्रतिनिधी🔘
🔘7378703472🔘