समाधान आवताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Summary
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा […]
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज सायंकाळी करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले आहे.
आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत.
समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली.
या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली होती. या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली.
त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना…
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750