BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

विविध रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार : रुग्णांची गैरसोय टाळण्यास होणार मदत

Summary

*पोलीस योध्दा न्युज* NCP गोंदिया वार्ता- कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दराने रुग्णांना उपलब्ध करुन देण्याचे कडक निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. तसेच या इंजेक्शनचा […]

*पोलीस योध्दा न्युज* NCP गोंदिया वार्ता- कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा
रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दराने रुग्णांना उपलब्ध करुन देण्याचे कडक निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार करुन रुग्णांना वेठीस धरल्यास कारवाई करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. रविवारी शहरातील विविध रुग्णालयांना या इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. तसेच सोमवारी सुध्दा १५० इंजेक्शनचे वितरण शहरातील विविध रुग्णालयांना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे पूर्ण लक्ष असून ऑक़्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी मेडिकलमधील ऑक़्सिजन टँक लवकर कार्यान्वित करण्यासाठी सुध्दा ते प्रयत्नरत आहे. पालकमंत्री यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांची त्वरित अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. बेडची संख्या वाढविणे, ऑक्सिजन कंसनट्रेटर मशिन खरेदी, आरटीपीसीआर चाचणी मशिन खरेदी आणि मेडिकलमधील डॉक्टरांची समस्या दूर करण्यात यावी. तसेच रुग्णांना वेळीच उपचार मिळेल व त्यांची गैरसोय होणार नाही,याची काळजी घेण्यास प्रशासनाला सांगितले आहे. सर्वत्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असून सर्वांनी घरीच राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प करावा असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *