लाखांदूर येथे विविध विकास कामांसाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नांना यश
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार गेली अनेक दिवस लाखांदूर तालुक्यात पेन्शनर असोसिएशन सभागृह तसेच गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूरच्या सभागृहाचे आणि लाखांदूर येथील कुणबी समाज सभागृहाच्या बांधकामासाठी या स्थानिक संस्थेच्या लोकांच्या वतीने प्रयत्न केले […]
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
गेली अनेक दिवस लाखांदूर तालुक्यात पेन्शनर असोसिएशन सभागृह तसेच गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूरच्या सभागृहाचे आणि लाखांदूर येथील कुणबी समाज सभागृहाच्या बांधकामासाठी या स्थानिक संस्थेच्या लोकांच्या वतीने प्रयत्न केले जात होते. या तिनही संस्थांना सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. नानाभाऊ पटोले सातत्याने प्रयत्नरत होते. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी नगरविकास विभागाला तसेच राज्याचे नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले, भेट घेतली आणि साकोली विधानसभा क्षेत्रात लाखांदूर येथे गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर सभागृह बांधकामासाठी नगर विकास विभागामार्फत एक कोटी रुपये तर पेन्शनर असोसिएशनच्या सभागृहा करिता पन्नास लाख रुपये आणि लाखांदूर येथील कुणबी समाज सभागृहाच्या बांधकामासाठी एक कोटी असा एकूण अडीच कोटी रूपयांचा निधी साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला. या तीनही गोष्टींचा त्यांनी सातत्याने राज्याचे नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. लवकरच लाखांदूर येथे या तीनही संस्थांचे अतिशय उत्तम आणि देखणे सभागृह तयार होईल याचा फायदा या संस्थांसह स्थानिक लोकांना देखील होईल. मतदारसंघातील विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असून येणाऱ्या दिवसांमध्ये देखील मतदारसंघासाठी भरघोस निधी उपलब्ध होईल अशी ग्वाही मा. नानाभाऊ पटोले यांनी दिली.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259