नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

रणनवरे बंधुंचे संत्रा बागायतीच्या अग्नी कांडात १३००संत्रा झाडे जळून खाक लाखोंचे नुकसान जामगढ येथील घटणार

Summary

कोंढाळी- नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील जामगढ़ येथील प्रगतिशील शेतकरी रणनवरे बंधूंचे संत्रा बागायतीमधील १३००से संत्रा झाडे व संत्रा बागायती करिता पाणी ओलती साठी आवश्यक ड्रिप एरिगेशन व स्प्रिंकलर तसेच सात हजार बांबू जळून कोळसा झाल्याने रणनवरे बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान […]

कोंढाळी-
नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील जामगढ़ येथील प्रगतिशील शेतकरी रणनवरे बंधूंचे संत्रा बागायतीमधील १३००से संत्रा झाडे व संत्रा बागायती करिता पाणी ओलती साठी आवश्यक ड्रिप एरिगेशन व स्प्रिंकलर तसेच सात हजार बांबू जळून कोळसा झाल्याने रणनवरे बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा जामगढ़ येथील प्रगतिशील शेतकरी विजयसिंह रणनवरे, मदनराव रणनवरे, प्रशांत रणनवरे,तथा रणजीत रणनवरे यांचे ओलीताची उत्कृष्ट संत्रा बागायती मधील चार ही रणनवरे बंधूंचे १३००से संत्राची बागायतला २४एप्रील चे सकाळी १०-३०वाजता चे दरम्यान रखरखत्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भयानक अग्नीकांडात रणनवरे बंधूंचे उत्तम पीक देणारी १३००से संत्रा ची झाडे जळून नष्ट झाली. तर, या बागायतीच्य ओलीतास लागणारी अत्याधूनीक अवजारे व संत्रा बागायती ला बांधण्यासाठी लागनारा उच्च प्रतिचे सहा हजार बांबू या अग्नीकांडात कोळसा झाल्याने रणनवरे बंधूंचे लाखोंचे नुकसान झाले असल्याची तक्रार माजी सभापती विजय सिंह रणनवरे यांनी २५एप्रीलला कोंढाळी पोलीस स्टेशन ला नोंदविली आहे.

लाखोंचे नुकसान
जामगढ़ येथील प्रगतिशील शेतकरी विजयसिंह, मदनराव, प्रशांतराव, तसेच रणजित सिंह चारही रणनवरे बंधुंचे उत्तम प्रततिचे१३०० संत्रा बागायती झाडे व या संत्रा उत्पादनासाठी लागणाऱ्या ओलीताची उत्कृष्ट साहित्य व बांबू चां अक्षरशः कोळसा झाला आहे. याचे अंदाजे वीस लाखांपर्यंत नुकसान झाले असल्याचे कृषी मित्र दिनेश ठाकरे यांनी सांगितले आहे. मात्र अंदाजे १०वर्ष संत्रा पीक उत्पादनाची किंमत काढली आणि खर्च वजा करता या संत्रा बागायती मधून लाखोंच्या उत्पादनाचे रणनवरे बंधुंचे नुकसान झाले आहे.
या करिता तालुका कृषी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व पालक मंत्री यांचे कडे दाद मागितली पाहिजे असे ही मत कृषी मित्र दिनेश ठाकरे व संत्रा उत्पादक व संत्रा बागायती व्यावसायिक राजा बेग यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी विजयसिंह रणनवरे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन लागते तक्रार दाखल केली असून या प्रकरणी अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी नागवे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *