मौदा क्षेत्रातील जनतेला सुध्द पाणी पुरवठया करिता कन्हान नदीपात्र प्रदुर्शन मुक्त करा – प्रकाश जाधव माजी खासदार ग्रामोन्नती प्रतिष्ठान च्या शिष्टमंडळाने नगर पंचायत मुख्याधिकारी ना निवेदनाने मागणी.
नागपूर मौदा : – शहरातील लोकवस्तीची घाण व साडणाणी नाल्या व्दारे कन्हान नदी पात्रात सोडुन त्याच नदी पा त्राचे नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक विषाणुजन्य रोग्याचा फैलाव होऊन आरोग्यास धोका होत आहे. शहरातील घाण व सांडपाणी कन्हान नदीत सोडणे बंद करा. किंवा नाल्यावर प्रकीया करून च स्वच्छ पाणी नदी पात्रात सोडुन कन्हान नदी प्रदुर्षन मुक्त करा. अशी मागणी माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतु त्वात सृञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपचायत मुख्याधिकारी कोमल कराळे हयाना निवेदन देऊन केली आहे.
नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र कन्हान नदी आहे. मौदा ची लोकसंख्या १८००० (अठरा हजार) असुन या नदी पा त्रात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. शहरातील नागरी घाण वाहून नेणारे सर्व सांडपाण्याचे नाले सरळ कन्हान नदी पात्रात सोडले आहे. नदीला गटारगंगेचे स्वरूप येऊन शहरातील नागरिकांचे मलमुत्र, मटण, कोंबडी चे वेस्ट नदीपात्रात सोडल्या जाते. दवाखान्यातील रुग्णाची घाणहीं याच नाल्यात सोडली जाते. इरिगेशन कॉलोनी चा नाला, गरदेव झोपडपट्टीचा नाला, चक्रधरस्वामी झोपडपट्टीचा नाला, वृंदावन लॉन पासुनचा नाला, केस लापुराचा नाला आणि इतर भागातुनही नागरी वसाह तीची संपूर्ण घाण नदी पात्रातच सोडल्या गेली कशी ? या प्रदुर्षित पाण्यावर कुठेही एसटीपी सारखी कोणती च व्यवस्था बसविण्यात आली नाही. नदी प्रदुर्षित होताना आपण कोणताच उपाय न योजने हेच न्यूनगंड आहे. ज्या नदीपात्रातून शहराला पिण्याचा पाणी पुरव ठा केला जातो, त्याच नदी पात्राला पुर्णता शहरातल्या घाणीने प्रदूषित केल्या गेले, हेच दुषित पाणी पंपाद्वारे टाकीत घेणे, ब्लिचिंग टाकणे व नळाद्वारे पिण्यासाठी जनतेला देने, हे कसे शक्य आहे ? एवढ्या मोठया लोकसंख्येच्या नगराला जलशुद्धीकरण यंत्रणा नसने हीच मोठी शोकांतिका आहे. जनतेला मलमुत्र मिश्रित पणीपुरवढा करणे हाच गंभीर गुन्हा आहे.
१) एनटीपीसी आणि कॉलोनीची घाणही गोवरी गावाजवळ कन्हान नदीपात्रात सोडल्या जाते.२) वेंक टेश पावर आणि साखर कारखान्यातील प्रदूषित पाणी कन्हान नदीपात्रातच सोडीत आहे. ३) हिंडालको कंप नीचे पाणीही याच नदीपात्रात सोडल्या जाते ४)माथनी ग्राम पंचायतीचे नागरी घाणीचे पाणीही याच नदीत सोडले आहे. अश्या सर्व बाजुने कन्हान नदी पात्रात सांडपाण्याची गटारगंगा सोडल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. दवाखान्यातील गर्दी वाढली आहे, आकस्मित मुत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने
विनाबिलब नदी प्रदुर्षण मुक्त करा, जनतेला शुध्दपाणी पुरावढा करा. अन्यथा जल जन आंदोलनाला सामोरं यावे लागेल, दुष्परिणामास आपण जबाबदार राहाल. शिष्टमंडळात माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान-पिपरी चे अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव, देवेंद्र गोडबोले, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, महेश काकडे, अशोक हिंगणकर, प्रविण गोडे, निलेश गाढवे, केतन भिवगडे, भगवान जुमळे, अक्षय पंचबुधे, संजय कानतोडे, ईश्वर डाहाके, सुधाकर हटवार, राजु बारई, राजु मेहर, राधेश्याम वैध, धर्मवीर यादव, सतिश बावनगडे, राजु सुपारे, पिंटु ़धनजोडे, आशिष मेश्राम, प्रभाकर घंटा, रामु तिरकुंडे, श्रीधर वडे, दिपक पिंकलकुंडे, राहुल मालवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद