महाराष्ट्र राज्य जि.प.नर्सेस संघटनेच्या सभेत छाया मानकर सचिव पदावरून पायउतार?
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नसेऀस संघटनेची दिनांक 28/2/2021 ला गोंडवाना सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .
या सभेला वर्धा येथील श्रीमती माया ढगे विस्तार अधिकारी तथा माजी अध्यक्ष उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील अध्यक्ष माया सिरसाट याच्या खंबीर, आणि निर्भिड नेतृत्वाखाली सभा पार पडली. या नर्सेस संघटनेच्या त्रैमासिक सभेच्या आयोजनाची जाहीर सुचना जिल्ह्यातील नर्सेस भगिनीना व संघटनेची पदाधिकारी व सभासदांना देण्यात आली व नर्सेस भगिनी च्या सेवा विषयक प्रश्न याविषयी सविस्तर विचार विनीयम करून सेवा विषयक अनेक प्रश्न मांडण्यात आले. यात सर्वानुमते ठराव घेण्यात आले. या सभेला मात्र नर्सेस संघटनेच्या सचिव छाया मानकर स्वतः हेतुपुरस्सर गैरहजर होत्या. सचिव पदावर असुनही स्वत गैरहजर राहून संघटनेच्या इतर सभासदांमध्ये चुकीचे गैरसमज पसरवून नर्सेस संघटनेच्या सभासदांना हजर राहू नये असे खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली. तरीही संघटनेच्या सभासदाची बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सभेत सर्व सभासदानी संघटनेच्या सचिव छाया मानकर यांच्यावर बेजबाबदार, निष्काळजी ,नियम बाह्य व गैरवर्तनावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आणि सचिव पदावर असलेल्या छाया मानकर यांच्या वर अविश्वास ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. आणि संघटनेच्या सर्व सभासदांनी सचिव पदावरून काढण्याचा एकच संघटितपणे आवाज उठविला व सर्वानुमते ठराव अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सचिव छाया मानकर यांनी नर्सेस भगिनीची दिशाभूल केली आणि गडचिरोली चे जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांना संघटनेच्या लेटरपैडवर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बिनधास्तपणे, निर्भीडपणे, संघटनेच्या हितासाठी सतत धावपड करणाऱ्या होतकरू पदाधिकाऱ्यांची बनवाबनवी करून खोटी तक्रार केली . मात्र सचिव यांनाच खोटे दोषारोप केल्याच्या मोबदल्यात पायउतार व्हावे लागले. हे विशेष.!!!
मुंबई
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम