प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. पूर्व विदर्भ प्रमुख व चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनि केले कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन.
Summary
चंद्रपूर:- प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपुर जिल्ह्याची कार्यकर्ता बैठक पुर्व विदर्भप्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.गजुभाऊ कुबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्य मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्हा कार्यकर्ता बैठक यशस्वीपने संपन्न झाली. बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गजुभाऊ यांनी पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा […]
चंद्रपूर:- प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपुर जिल्ह्याची कार्यकर्ता बैठक पुर्व विदर्भप्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.गजुभाऊ कुबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्य मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्हा कार्यकर्ता बैठक यशस्वीपने संपन्न झाली.
बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गजुभाऊ यांनी पक्ष वाढीसाठी गाव तिथे शाखा बनवण्याचे आदेश दिले. वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.अमोल बावने आणी राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते प्रफुल चवरे, अनेक तरुणांनी विदर्भप्रमुख श्री .रुग्णमीत्र गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली जाहिर प्रवेश केला.
सर्व नवनिर्वाचित प्रहारसेवकांंचे मणपुर्वक अभिनंदन व स्वागत प्रहार तर्फे करण्यात आले. शासकिय मेडिकल काँलेज चंद्रपुर येथील कत्रांटी कामगार यांना गेली सहा ते सात माहिन्यापासुन वेतन मिळाले नाही व जो रोजगार मिळतो तो लेबर कायद्याच्या नियमनुसार मिळत नसुन खुपच कमी मिळत आहे व आम्हाला न्याय मिळवुन द्या अशी मागणी कत्रांटी कामगार यांनी पुर्वविदर्भप्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.गजुभाऊ कुबडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातुन निश्चीतच न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन पुर्वविदर्भप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुख श्री.गजुभाऊ कुबडे यांनी कत्रांटी कामगारांना दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहारचे माजी तालुका अध्यक्ष सतिश बिडकर, महेश हजारे, नितीन कुंभरे, संदीप झाडे, लिलेश ढवस, पंकज माणूसमारे, किशोर डुकरे, अनेक प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर