BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

पौर्णिमा च्या रुपाने यशस्वी गौरवशाली ‘जयभीम’चा जलवा…!

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 3 मे. 2021 पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रदान केले जाणारे राज्याचे सर्वोच्च सन्मानचिन्ह (DG’s Igsignia) पोलिस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले अन् ओठांवर आपसुकच शब्द आला- जय […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 3 मे. 2021
पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रदान केले जाणारे राज्याचे सर्वोच्च सन्मानचिन्ह (DG’s Igsignia) पोलिस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले अन् ओठांवर आपसुकच शब्द आला- जय भीम !
सध्या पुणे शहर येथे उप आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या पौर्णिमा ताई ह्या शोभाताई आणि 1984 ची भिवंडी दंगल शमविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक के. पी. गायकवाड यांच्या कन्या असून लद्दाख राज्यात पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या सतीश खंदारे यांच्या सहचारिणी आहेत. त्यांच्या आई शोभाताई ह्या ‘जय भीम’ या क्रांतिमंत्राचा थेट डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 1938 ला मक्रणपूर परिषदेत पहिल्यांदा उद्घघोष करणा-या स्वातंत्र्य सेनानी दलितमित्र स्मृतिशेष भाऊसाहेब मोरे यांच्या ज्येष्ठ कन्या !
असा समृद्ध वारसा लाभलेल्या पौर्णिमा गायकवाड संविधानिक मूल्यांचे जतन करत वाटचाल करत असून हा सन्मान हा त्याच वाटचालीला आलेलं गोंडस फळ होय. ‘गुणवत्ता पूर्ण सेवा’ या कॅटेगरीत त्यांचा करण्यात आलेला सन्मान हा पात्रतेचा ख-या अर्थानं गौरव होय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *