चंद्रपुर जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यु चा विरोध
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वारंवार होणाऱ्या जनता कर्फ्यु मुळे गरीब व मध्यम वर्गाला भिकेला लावणारे कारस्थान स्थानिक प्रशासन करीत आहेत. त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपुर तर्फे आज जनता कर्फ्यू विरोधात आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महानगर पालिके समोर घोषणा देत जनता कर्फ्यू चा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, शहर अध्यक्ष बंडू ठेंगरे, रूपचंद निमगड़े, रामजी जुनघरे, सुभाषचंद्र ढोलने, सुभाष थोरात, सोनल वाळके, रमेश ठेंगरे, सुमित मेश्राम, छोटू दहेकर, कृष्णक पेरकावार, अशोक पेरकावार, सुनील भसारकर, विष्णु चापड़े, प्रणीत तोड़े, अक्षय लोहकरे, विशेष निमगडे, यशवंत गायकवाड़, सुरेश वेस्कडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.