BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*खोटी व बनावट तक्रार दाखल प्रकरण भोवले* *गटशिक्षणाधिकारी नाट यांचेवर अट्रासिटी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल*

Summary

ब्रह्मपुरी- नागभीड आणि ब्रह्मपुरी येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद नाट यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाले त्यामुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. नागभीड व […]

ब्रह्मपुरी-
नागभीड आणि ब्रह्मपुरी येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद नाट यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाले त्यामुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.
नागभीड व ब्रह्मपुरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद नाट यांनी ब्रह्मपुरी व नागभीड पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना हाताशी धरून सायन्स किट खरेदी केल्या, त्यात मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचार व अनियमिततेची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी शासनाकडे केली होती. तसेच सायन्स किट खरेदीची माहिती पंचायत समिती ब्रह्मपुरी येथील माहिती अधिकारी (शिक्षण) यांचेकडे माहितीचा अधिकार अधिनियमानुसार मागणी केली होती. मात्र, विहित मुदतीत माहिती न मिळाल्यामुळे सांगोडे यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील केले. अपिलावर सुनावणी झाल्यानंतर दहा दिवसांनी पं. स. ब्रह्मपुरी चे माहिती अधिकारी (शिक्षण) यांनी अन्य व्यक्तीच्या भ्रमण ध्वनिवरून दिनांक 20 जानेवारी 2021 ला सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी श्री सांगोडे यांना फोन करून माहितीकरिता बोलवण्यात आले. मात्र, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बोलावल्यामुळे सांगोडे यांच्या मनात काहीतरी काळंबोरे असल्याची शंका निर्माण झाली व ते त्या दिवशी माहिती घेण्यासाठी पंचायत समिती ब्रह्मपुरी कार्यालयात गेले नाही. असे असतांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांनी 20 जानेवारी 2021 ला जयदास सांगोडे यांनी पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी 6.10 ते 6.30 वाजता येऊन मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची खोटी व बनावट तक्रार पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दाखल केल्यामुळे सांगोडे यांच्याविरुद्ध 353,294,व 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात सांगोडे यांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटक पूर्व जामीन घेतला आहे.
त्यानंतर जयदास सांगोडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत केलेली तक्रार व त्या अनुषंगाने मागितलेली माहितीच्या अधिकारात माहितीमुळे चिडून जातीय द्वेषातून नाट यांनी माझी खोटी व बनावट तक्रार करून आपल्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी कट कारस्थान करून मला जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याने नाट यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सांगोडे यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला दिनांक 23 जानेवारी 2021 ला दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती श्री प्रमोद नाट यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे सुधारित अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा 2015 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री नाट यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार व अनियमितता याबाबतची चौकशी करून नाट यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी तक्रार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे प्रहार संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री नाम.वडेट्टीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.चंद्रपूर यांनी आठ दिवसात प्रभारी गटशिक्षणाधिकारी नाट यांचेकडून नागभीड व ब्रह्मपुरी पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार काढून त्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले होते. यानंतरही प्रभारी गटशिक्षणाधिकारी नाट यांचे विरुद्ध कोणतीही कार्यवाही केली गेली नाही त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री जयदास सांगोडे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देऊन प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांच्या भ्रष्टाचार व अनियमिततेची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने नाम. कडू यांनी चौकशीचे आदेश दिले होते. प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी गोत्यात येण्याची शक्यता असल्यामुळे प्रहार संघटनेचे सांगोडे यांच्या विरुद्ध कुंभाड रचून त्यांच्याविरुद्ध खोटी व बनावट तक्रार दाखल करण्यात येऊन सांगोडे यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. श्री नाट यांच्या भ्रष्टाचार व अनियमिततेला संरक्षण देण्यात जिल्हा परिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी गुंतले असल्यामुळे श्री नाट यांना निलंबित करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत प्रहार शिक्षक संघटना आंदोलन करणार असंल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात खळबळ निर्माण झाली असून पालकमंत्री नामदार वडेट्टीवार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *