BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कोट्यावधींचा घोटाळा करून पसार झालेला आरोपी रोखपाल निखिल घाटे गजाआड, चार दिवसांची पोलीस कोठडी

Summary

चंद्रपुर:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कोट्यावधींचा घोटाळा करून पसार झालेला आरोपी रोखपाल निखिल घाटे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजाआड केले आहे. दरम्यान निखिल घाटे ला ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. विदर्भात सर्वाधिक उलाढालींमध्ये येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती […]

चंद्रपुर:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कोट्यावधींचा घोटाळा करून पसार झालेला आरोपी रोखपाल निखिल घाटे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गजाआड केले आहे. दरम्यान निखिल घाटे ला ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. विदर्भात सर्वाधिक उलाढालींमध्ये येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गणली जाते. या बँकेत रोखपाल पदावर असलेल्या निखिल घाटे नामक व्यक्तीने ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता त्याने स्वतःच्या खिशात टाकले आहेत. जिल्हा परिषद चंद्रपूर समोर असलेल्या जिल्हा बँक शाखेत अपहाराचा हा प्रकार गेल्या ५ महिन्यांपासून सुरू होता. बँकेने ऑडिट करून सदर गैर व्यवहार हा ३ कोटी ५४ लाखांचा असल्याचा अहवाल दिला आहे..

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *