कामात गैरप्रकार नसल्यास तपास कामावर हरकत कशाला? खाजगी संस्थे ऐवजी विभागीय चौकशी ची मागणी!
Summary
काटोल-प्रतिनिधी/-दुर्गाप्रसाद पांडे नागपुर जिल्ह्यातील जिल्हापरिषद अंतरगत जलसंपदा विभागामार्फत विविध तालुक्यांमधे सुरू असलेल्या बांधकामाबाबद आलेल्या तक्रारी वरून संबधित कामांची तपसनी करणार्या खाजगी संस्थे विरूद्ध या कामांचे बांधकाम करनारे कत्रांटदार-पोट कत्रांटदारानी या खाजगी संस्थे कडून तपासनीचा विरोध दर्शविला असुन संबधित कामांची तपासनी […]

काटोल-प्रतिनिधी/-दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर जिल्ह्यातील जिल्हापरिषद अंतरगत जलसंपदा विभागामार्फत विविध तालुक्यांमधे सुरू असलेल्या बांधकामाबाबद आलेल्या तक्रारी वरून संबधित कामांची तपसनी करणार्या खाजगी संस्थे विरूद्ध या कामांचे बांधकाम करनारे कत्रांटदार-पोट कत्रांटदारानी या खाजगी संस्थे कडून तपासनीचा विरोध दर्शविला असुन संबधित कामांची तपासनी करनार्या संस्थे विरूद्ध स्थानिक वृतपत्र प्रतिनिधींकडे तक्रारी दिल्या आहेत।
या प्रकरणी माहीती अशी की न्यु एडवेंट आय क्यू आय फौंडेशन तर्फे नरखेड तालुक्यातील खराळा, पिंपळधरा, काटोल तालुक्यातील रिधोरा, कचारी सावंगा, वाजबोडी, तर सावनेर तालुक्यातील तेल कामठी या गाव परिसरातील लघु व मध्यम तलावांचे बांधकामा बाबद मिळालेल्या तक्रारींचे निरासरन व पाहणी केली।
या कामांची पाहणी करन्याचा संबधित संस्थेला अधिकार नाही, तसेच संबधीत कंपनी कामांची पाहणी केल्यावर संबधीत कत्रांटदारांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून आपले कामात गैर प्रकार आहे। या कामाची तक्रार झाल्यास कामाचे बील निघनार नाही। अस्या तक्रारी कत्रांटदारानी केल्या असून संबधित जलसंपदा विभागाचे अधिकार्यां ची फुस या खाजगी तपास यंत्रणेला असल्याचे ही कंत्राटदाराचा एक वर्ग बोलत आहेत ।
तर न्यु एडवेंट आय क्यू आय फौंडेशन चे अध्यक्ष अशरफ आली यांनी सांगितले की आमचे पोर्टलवर बांधकामा संबधी मिळालेल्या तक्रारी वरून संबधित विभागाकडे भेटून त्या त्या कामांची चौकशी करने बाबद माहीती देऊनच आम्ही तपासी करून हा तपानी अहवाल संबधीत विभागाचे प्रमूखांना अहवाल पाठवित असतो असे सांगितले आहे ।
*कामात गैर प्रकार नसेल तर ठेकेदारांची आदळ आपट कशाला?*
काटोल नरखेड सह संपुर्ण जिल्हातील जलसंपदा (लघुसिंचन)विभागा कडून जलसंवर्धनावर दर कोट्यावधी ची राशी खर्च होते, या कामांची निविदा-25, 30,35, 37टक्के बीलो वर काम घेतात, त्यातही अनेक जन पेटी कत्रांटदार कामे करतात यातही कामांची गुणवत्ता आवश्यक गुणवत्ता असने गरजेचे असतेच याची पाहणी किंवा तपासणी कुणीही करो ,झालेल्या किंवा सुरू असलेल्या पाझर , लघू, गाव तलावांचे कामांची चौकशी कोणत्या ही यंत्रनेने केली यात *कर नही तो डर कशाला* *किंवा दुध का दूध पाणी का पाणी*
या प्रकरणी नागपुर जिले प अध्यक्ष, जि प चे मुख्य कार्यपालन अधिकारी ( सी ई ओ)तसेच लघुसिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकार्यांनी काटोल नरखेड तालुक्यातील लघुसिंचन(जलसंपदा) विभागाचे वर्ष 2018ते 2021पर्यंतचे पाझर तालाव, लघु तलाव, गावतलावांचे कामांची गुणवत्ता दक्षता विभागाकडून करवून घ्यावे जेणेककरून संबधीत कामातील झालेला किंवा सुरू असलेला बांधकामातील प्रकार ( गैर ) प्रकाराची सत्यता उघड होऊ शकते। अशी मागणी करण्यात येत आहे।