कन्हान न प स्वच्छता कामगाराची १५ दिवसा पासुन कामबंद आंदोलन स्वच्छता कामगाराचे तीन महिन्या पगार नसल्याने दिवाळी अंधारात.
नागपूर
कन्हान (ता प्र) : – कन्हान नगर परिषद येथील स्वच्छता कामगाराचे तीन महिन्याचे थकित पगार वेळेवर न मिळाल्याने पंधरा दिवसा पासुन कामबंद आंदोलन सुरू असल्याने दिवाळी अंधारात असल्याने माजी न प उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक व राज दारोड हयांनी स्वच्छता कामगाराना मिठाई पँकेट भेट देऊन त्यांची दिवाळी साजरी केली.
कन्हान शहराची स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी यांचा तीन महिन्याचा पगार थकीत असल्या ने पंधरा दिवसापासुन दिवाळी पुर्वी पगार मिळावा करिता आंदोलन सुरू असुन दिवाळीच्या दिवसी सुध्दा पगार न मिळाल्याने स्वच्छता कामगारांची दिवाळी अंधारात होत असल्याचे लक्षात आल्याने माजी न प उपाध्यक्ष त़था भाजपा कन्हान अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक व राज दारोड हयांनी कन्हान नगरपरिषद परिसरात स्वच्छता कामगाराना मिठाईचे पॉकेट वितरण करून त्याची दिवाळी गोळ केली. याप्रसंगी पत्रकार सुर्यभान फारकाडे, कमल यादव, अशोक पाटिल, जाहीद भाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राज घोराड यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यकत केले.
विठ्ठल ठाकरे
नागपूर जिल्हाप्रतिनिधी
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9850310282