BREAKING NEWS:
हेडलाइन

ओबीसी समाजाच्या विरोधात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचा विरोध करण्याकरिता आंदोलनाची भूमिका ठरविण्याकरिता ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता…

Summary

जिल्हा प्रतिनिधी : प्रा शेषराव येलेकरकेंद्र व महाराष्ट्र शासन अनेक वर्षापासून 52 टक्के असलेला ओबीसी समाजावर सतत अन्याय करीत असून समाजाच्या मागण्यावर निर्णय घेत नाही संविधानाचा कलम 340 नुसार अधिकार व सुविधा ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे ते अजून पर्यंत या  […]


जिल्हा प्रतिनिधी : प्रा शेषराव येलेकर
केंद्र व महाराष्ट्र शासन अनेक वर्षापासून 52 टक्के असलेला ओबीसी समाजावर सतत अन्याय करीत असून समाजाच्या मागण्यावर निर्णय घेत नाही संविधानाचा कलम 340 नुसार अधिकार व सुविधा ओबीसी समाजाला मिळायला पाहिजे ते अजून पर्यंत या  केंद्र व  पुरोगामी महाराष्ट्रात राज्य सरकारने दिलेल्या नाहीत . या विरोधात आंदोलनाची भूमिका ठरविण्याबाबत राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2020 रोजी सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च पावनभूमी सोमलवाडा नागपुर (तायवाडे सरांच्या घराजवळ) दुपारी बारा वाजता आयोजित केलेली आहे. या सभेला सर्व ओबीसी संघटना व जातीय संघटना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राजकीय समन्वयक डॉ खुशाल बोपचे, ,समन्वयक डॉ अशोक जीवतोडे, प्रा शेषराव येलेकर , सुषमाताई भड,  रेखाताई बराहते , कल्पनाताई मानकर,प्रा शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर ,शकील पटेल, संजय पन्नासे, खेमेंद्र कटरे ,बबलू कटरे, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, मुकेश पुडके ,विजय पिदूरकर , शाम लेडे, रोशन कुंभलकर, निलेश कोढे, मयुर वाघ इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *