*संत गाडगेबाबांची ६४ वी पुण्यतिथी हिराबाई शाळेत साजरी*
नागपूर कन्हान : – मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबांची ६४ वी पुण्यतिथी हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे शाळेच्या प्राणांगात साजरी करण्यात आली.
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान शाळेचे संचालक नरेंन्द्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख अतिथी नागपुर जिल्हा किसान अध्यक्ष ओमप्र काश काकडे,माझी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अध्यक्ष प्रशांत बाजीराव मसार,नगरसेविका रेखाताई टोहणे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा प्रतिमेस पुष्पहार, पुष्पगुच्छ माल्यार्पण अर्पित करून सामुहिक विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी ओमप्रकाश काकडे ,प्रशांत बाजीराव मसार, रेखा टोहणे यांनी संत गाडगेबाबाचां जिवनावर मार्गद र्शन करीत स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक जेष्ठ नागरीक दिलीपजी सायरे व अभार प्रदर्शन हिराबाई शाळा वसतिगृह अधिक्षक गणेश रामापुरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास चंदन मेश्राम, अमोल साकोरे, प्रदीप बावणे, दिपक तिवाडे, पकंज गजभिये, निलेश सायरे आदी उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535