BREAKING NEWS:
महाराष्ट्र

राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्कार साटक प्राथमिक आरोग्य केंद्रला घोषित

Summary

नागपूर: – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आली आहे. आयएसओ मानांकन प्राप्त पारशिवनी तालुक्या तील साटक प्राथमिक आरोग्य […]

नागपूर: – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आली आहे.
आयएसओ मानांकन प्राप्त पारशिवनी तालुक्या तील साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शास नाने कायाकल्प प्रसंशा पुरस्कार पनास हजार रोख पुरस्कारांची घोषणा केली आहे. या रूग्णालयातील चांगल्या सेवेबद्दल आणि रूग्णाना उत्कृष्ट सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या रूग्णालयाचे परिक्षण करून सन २०१९-२० साठी प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ८०.८० टक्के गुण मिळाल्याने कायाकल्प प्रसंशा पुरस्कारांची घोषणा करून सोमवारी आरोग्य मंत्रालयाने पत्राव्दारे केंद्रला ही माहीती कळविली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, आरोग्या च्या सोयीसुविधा या निकषाच्या आधारे पनास हजार रुपये (५०,००० रू) रोख कायाकल्प प्रसंशा पुरस्कारा च्या मानकरी डॉ वैशाली हिंगे यानी स्वत: मुख्यालयी राहुन कर्मचा-यांच्या सहकार्याने रूग्णालयात चांगली आरोग्य सेवा व सोयी सुविधा प्रदान करून मिळवि ल्याने ग्रा प सरपंचा सिमाताई उकुंडे व यशवंतराव उकुंडे हयानी डॉ वैशाली हिंगे, प्रतिभा झाडे, कल्पना मानकर सह सहकारी कर्मचा-यांचे पुष्पगुच्छ गुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच साटक परिसातुन कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
✍🏼दिलीप भुयार
9503309676
पश्चिम नागपूर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *