राजकीय ब्रेकिंग : किशोर जोरगेवारांचा राष्ट्रवादी प्रवेश???
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार हे टीव्ही सोडून घड्याळ बांधणार असल्याची जोरदार चर्चा चंद्रपूर च्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता टिकून राहील अशी चिन्हे दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी इंकमिंग सुरू आहे. ओबीसी समाजाचे मोठे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी पक्षाचे मनोबल वाढले आहे. अनेक माजी आमदारांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मात्र आता कुठल्या तरी पक्षाचा आधार घेतला पाहिजे असे त्यांना वाटत असताना त्यांची पसंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. लवकरच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत याबाबत त्यांची बैठक होणार असून त्यानंतर पक्षप्रेवश घेण्याबाबत ते ठरवणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले असल्याचे अनेक जण चर्चा करत आहेत . तसेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्यास एक महामंडळ देऊन राज्यमंत्री पदाचा दर्जा किशोर जोरगेवार यांना देण्याची ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तीकडून कळले.
मात्र 200 युनिट मोफत वीजबिलाच्या मुद्द्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध आहे. तसेच आमदार जोरगेवार यांच्या अवैध दारू विक्रीच्या कारवाईला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गांभीर्याने घेतले नाही अशावेळी त्या पक्षात गेल्याने जनतेला न्याय मिळेल का ? हा मोठा प्रश्न आहे. संभाव्य परिस्थितीचा अभ्यास करून त्यांना महामंडळ देण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते अशीही चर्चा फिरत आहे.
मात्र आ. किशोर जोरगेवार हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात असल्याचे त्यांच्या एका खंद्या समर्थकाने सांगिल्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी ” ब्रिगेडिअर घड्याळ बांधणार? ; “टीव्ही महामंडळ मिळविण्यासाठी घड्याळ ” अश्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने आज दुपारपासून अचानक जोरगेवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या सोबतच त्यांनी महामंडळाची मागणी केल्याच्या चर्चांना वाऱ्याच्या वेगाने उधाण आले आहे.
संदर्भात राज्याचे जलसंधारण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या कार्यालयाशी टीम खबरकट्टा ने संपर्क साधला असता येत्या 28 जानेवारी ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जनसंवादाकरिता येण्याची शक्यता असून अजून दौऱ्याची रूपरेखा निश्चित झाली नसल्याचे कळविले.
बाबीविषयी राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले तरीही त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू असल्याने रीतसर कोणत्याही पक्षात प्रवेश घेतल्यास आमदारकी रद्द होईल त्यामुळे असे करायचे झाल्यास त्यांना पक्षाला पाठिंबा जाहीर करता येईल परंतु अधिकृत प्रवेश घेता येणार नाही असे स्पष्ट केले.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर