महाराष्ट्र

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून एम.आय.डी. सी.

Summary

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून एम.आय.डी. सी.च्या मुख्य जलवाहिनीतून शिळफाटा ते दिवा मंजुर करण्यात आलेल्या नवीन जलवाहिनीच्या कामाचा आढावा सुभाष भोईर यांनी घेतला. त्याच बरोबर प्रगती पथावर असलेल्या मुंब्रा-बायपास ते कल्याणफाटा रस्तारुंदीकरण व त्याला जोडण्यात येणाऱ्या जोड रस्त्यांच्या कामाची […]

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नांतून एम.आय.डी. सी.च्या मुख्य जलवाहिनीतून शिळफाटा ते दिवा मंजुर करण्यात आलेल्या नवीन जलवाहिनीच्या कामाचा आढावा सुभाष भोईर यांनी घेतला.
त्याच बरोबर प्रगती पथावर असलेल्या मुंब्रा-बायपास ते कल्याणफाटा रस्तारुंदीकरण व त्याला जोडण्यात येणाऱ्या जोड रस्त्यांच्या कामाची पहाणी करून त्यांनी लवकरात लवकर कल्याणफाटा जंक्शन वरील रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच रस्तारुंदीकरणात बाधित होत असणाऱ्या नागरिकांना प्रथम योग्य तो मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले.
सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व एम.एम.आर.डी. ए चे अधिकारी उपस्थित होते. जगदीश जावळे पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *