मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, ‘एवढ्या’ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार
Summary
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलगी परिसरातून इतर परिसरात बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून एक किलोमीटर परिसरातील सर्व […]
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलगी परिसरातून इतर परिसरात बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत.
शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने या कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
जंगलगीपासून एक किलोमिटर क्षेत्रातील पक्षी, पक्षी खाद्य, अंडी, कोंबडी खत, पोल्टी अनुषंगिक साहित्य देखील शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकार शंभरकर यांनी दिले आहेत.
याशिवाय जंगलगी गावापासून एक किलोमीटर क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.या क्षेत्रात देखील कोंबड्यांची वाहतूक, विक्री, बाजार, जत्रा, प्रदर्शनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे
जंगलगी, जंगलगी वस्ती, सलगर बु., सलगर खु., आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवणगी ही सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश होईपर्यंत घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क