मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची सरंपच व उपसरपंच निवड ‘या’ तारखेला होणार!
Summary
सोलापूर जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवडीचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला. त्यानुसार तीन टप्प्यात सरपंच निवडीचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची निवड येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल […]
सोलापूर जिल्ह्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवडीचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला. त्यानुसार तीन टप्प्यात सरपंच निवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीची निवड येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून कृषी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवेढा, मोहोळ, सांगोला, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माळशिरस , पंढरपूर , माढा , दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यांमधील सरपंचांच्या निवडी विविध टप्प्यात होणार आहेत.
कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार दिवस ठरविण्यात आले आहेत. अक्कलकोट,सांगोला यासह अन्य तालुक्यांमधील सरपंच निवडी तिन्ही टप्प्यात होणार आहेत.
ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेच्या अध्यासी अधिकाऱ्यांनी पहिल्या सभेची नोटीस सरपंच निवडीच्या अगोदर काढावी, पहिल्या सभेचे इतिवृत्त तहसिलदारांकडे सोपवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आदेशातून दिल्या आहेत
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750