डोंबिवली मधील विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याची मागणी…. केडीएमसी आयुक्तांना दिले निवेदन….
कल्याण : डोंबिवली मधील विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याची मागणी करत केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिले आहे.सर्व लॉकडाउन उघडले, बाजार सुरु झालें, आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ,जीम (मोर्चे, आंदोलने.) समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही. तर शाळेत जाऊन कोरोना कसा होईल? असा सवाल त्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेले आयुक्तांना निवेदन.
कोरोना काळात आपण ज्या सेवा पुरविल्या जी काळजी आमची घेतली त्यासाठी आपले आभार मानतो. सर आम्ही घरात होतो, पण आपले कार्य फेसबुक वर मिडीया मध्ये दिसत होते.खूप कठीण सर, आम्ही पोलीस, प्रशासन, डॉक्टर्स, तहसील व सफाई कर्मचारी यांना सर्वांनां धन्यवाद देतो.
“आमची शाळा” सर, खरे तर ही आमची शाळा राहीलीच नाही. आम्ही उगाच आमची शाळा म्हणतोय. कारण ही शाळा गेल्या ९ महीन्या पासून बंद आहे. आमचे कसे म्हणावे ? मान्य आहे आम्हाला की हे आमच्या आरोग्यासाठीचा शासनाचा योग्य निर्णय असेल.पण एक विद्यार्थि म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षण घेताना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. कान ,डोळे, डोकं यांचा खूप प्रॉब्लेम सुरु आहे. आम्ही खूप लहान आहोत पण स्पर्धा युगात टीकुन रहाण्यासाठी आम्हाला घाबरुन घरी बसणे योग्य वाटत नाही.मला NDA मध्ये करीअर करायचे आहे. कोणी डॉक्टर होणार, कोणी IAS, कोणी IPS. आम्ही लहान असलो तरी आमची स्वप्ने मोठी आहेत. आम्हाला या साथील घाबरवुन घरात बसवण्या पेक्षा लढायला शिकवा. हेच आमचे मागणे आहे.एक प्रश्न पण आहे. सर्व लॉकडाउन उघडले, बाजार सुरु झालें, आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम (मोर्चे, आंदोलने.) समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही. तर शाळेत जाऊन कोरोना कसा होईल? झाला तरी माझ्या आजारासाठी सरकार दोषी नसेल. माझ्या प्रतीकार शक्तीचा दोष असेल.आमचे हे मागणे सरकार पर्यंत पोहचवा. आमची शाळा सुरु करा. खूप जणांचा याला विरोध असेल पण ज्यांना शिकायचं आहे त्यांच्या साठी तरी शाळा सुरु करा. चूक भूल लहान समजून माफ करा.आम्ही सर्व नियम पाळु. मस्ती पण नाही करणार. हा बाल हट्ट आहे आमचा.
वेदांत निलेश कुलकर्णी – ८वी (भरत)
ओजस प्रभु
प्रणव सारंग
विद्यानिकेतन शाळा, डोंबिवली. पु.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य