डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमुळेच देश एकसंघ – पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांचे महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Summary
नाशिक, ६ डिसेंबर,(जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष असून सगळ्या जगात त्यांना मान्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेने देश एकसंघ असून देशात आजही लोकशाही टिकून असल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी […]

नाशिक, ६ डिसेंबर,(जिमाका वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष असून सगळ्या जगात त्यांना मान्यता आहे. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेने देश एकसंघ असून देशात आजही लोकशाही टिकून असल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालीमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेविका सुषमा पगारे, कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषेदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, संतोष सोनपसारे, अनिता भामरे, अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जगातील अनेक विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांच्या नावाची दालने आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारताचे संविधान अनेक देशांना घटना लिहिण्यास मार्गदर्शक आहे. आजही अनेक देश भारताच्या संविधनाचा अभ्यास करुन त्यांच्या देशाची घटना तयार करत असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.