BREAKING NEWS:
महाराष्ट्र

डंपर पलटल्याने ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील घटना वेकोलि अधिकाऱ्यांचे सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष

Summary

राजुरा – वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपनकास्ट खाण प्रकल्पात कोळशाची वाहतूक करणारा डंपर पलटी झाला. डंपर ऑपरेटरचा वेकोलि रीजनल हॉस्पिटलमध्ये आणताच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक ऑपरेटरचे नांव अक्षय भगवान खरतड (वय 50) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10.30 वाजता […]

राजुरा – वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपनकास्ट खाण प्रकल्पात कोळशाची वाहतूक करणारा डंपर पलटी झाला. डंपर ऑपरेटरचा वेकोलि रीजनल हॉस्पिटलमध्ये आणताच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक ऑपरेटरचे नांव अक्षय भगवान खरतड (वय 50) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10.30 वाजता बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपनकास्ट मध्ये कोळसा स्टॉक 24 जवळ कोळसा वाहतूक सुरू होती. कोळशाने भरलेल्या डंपर क्र. 682 वरून कोळसा रिक्त करत असताना अचानक पलटी झाला. डंपर पलटल्याने डिझेल गळतीमुळे डंपरला आग लागली.
डंपर पलटताच थोड्या अंतरावर आपली ड्युडी करत असलेले संतोष गटलेवार, अविनाश वैरागडे, नासिर खान, जहीर पठान वेकोलि कर्मचारी घटनास्थळी धावत आले आणि आगीची पर्वा न करता कंत्राटी कामगारांच्या मदतीने डंपरच्या केबिनमध्ये अडकलेला अक्षय ला बाहेर काढत त्याला उपक्षेत्रीय व्यवस्थापकाच्या जीपमध्ये वेकोलि क्षेत्रीय रुग्णालयात आणले. रुग्णालयात आणताच अक्षयचा मृत्यू झाला.

मृतक अक्षय हा हॉकी, फुटबॉल आणि एथेलेटिक्सचा उत्कृष्ट खेळाडू होता. वेकोली आंतर-प्रादेशिक स्पर्धांमध्ये तो अव्वल राहायचा. त्याचबरोबर तो हॉकीचा सर्वोत्कृष्ट गोलकीपरही होता.

बल्लारपूर क्षेत्रातील खाणींमध्ये कामगारांच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. असे सांगितले जात आहे की सुरक्षेच्या संदर्भात आज दुपारी 12 वाजता उपक्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्याआधी हा मोठा अपघात झाला. सुरक्षा नियमांचा हवाला देत वेकोली अधिकाऱ्यांची पितळ मात्र या घटनेमुळे उघडे पडले आहे.

आठवड्यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी लोडिंग मशीन पीसी नं. 197 च्या सुरक्षा कर्मचाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून 38 हजार रूपये किमतीचे 500 लिटर डिझेल दरोडेखोरांनी तलवार दाखवून लुटले होते.

8 फेब्रुवारी रोजी सास्ती खाण येथील ओव्हर बर्डन फॉलमध्ये 5 मजदूर थोडक्यात बचावले होते. याच महिन्यात हा अपघात झाल्याने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच वेकोली बल्लारपूर परिसराच्या खाणींमध्ये होणारे अपघात रोखण्यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *