BREAKING NEWS:
महाराष्ट्र

टेकाडी नविन वसाहतीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Summary

नागपूर (कन्हान ): – वेकोलि नविन वसाहत टेकाडी फाट्यावर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्या त आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. व तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण […]

नागपूर (कन्हान ): – वेकोलि नविन वसाहत टेकाडी फाट्यावर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्या त आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकविण्यात आला. व तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मोमबती प्रज्वलित करित कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रस्तावित बौद्ध विहार परिसराचा लवकरच विकास करण्याचे आश्वासन सौ रश्मी बर्वे यांनी आपल्या छोटेखानी मार्ग दर्शनातुन दिले. याप्रसंगी टेकाडी ग्राम पंचायत चे सरपंचा सुनिता मेश्राम, कांद्री ग्रा पं चे उपसरपंच श्याम कुमार बर्वे, पंचायत समिती सदस्य करुणा भोवते, रिपब्लिकन भीमशक्तीचे कैलास बोरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. घाटरोहणा, टेकाडी, गोंडेगाव, येसंबा, वाघोली, वराडा, कोळसा खदान या गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ कांबळे , बाबुलाल प्रसाद, चंद्रमणी पाटील हयांनी कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता विशेष परिश्रम घेतले. सर्वश्री चंद्रशेखर पौनिकर, अभिषेक मेश्राम, प्रभास कांबळे, उत्कर्ष शेंडे, शशांक भोवते, मारोती मेश्राम, विनोद गजभिये, गोविंदा खोबरागडे, राजेश फुलझेले, कमलेश वासनिक, माणिक भोवते, भिमराव काकडे, रणजीतेश भगत, अर्चना गजभिये, इंदिरा कांबळे यांच्यासह अनेक नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *