घटनेतील दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार – खासदार प्रफुल पटेल भंडारा ज़िल्हा सामान्य रुग्णालयाला दिली भेट
Summary
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारच्या पहाटे लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हि वेदनादायी व मन सुन्न करणारी घटना आहे. हि घटना ज्यांच्या दुर्लक्षीतपणा व निष्काळजीपणामुळे घडली. या बाबीची सखोल चौकशी केली जात असून यातील दोषीवर निश्चित कारवाई होणार तसेच या घटनेची पुनर्रावृती होऊ नयेया बाबीची दाखल राज्य सरकार घेणार याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री उद्धव ठाकरे व राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. श्री राजेश टोपे यांच्याशी केली आहे . या घटनेला आढळणाऱ्यांची कुठलीच गय केली जाणार नाही अशीही ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी घडलेल्या घटनेचा आढावा तसेच आपदग्रस्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खा. प्रफुल पटेल हे आज रविवारी (दि-१०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. रुग्णालयात रुग्ण सेवेच्या दृष्टीने रुग्णालयातील उणीवा, उपाययोजना आदी बाबी जाणून घेतले. या सर्व उणीवा त्वरीत दूर करण्यास सांगितले. रुग्णसेवेत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी यावेळी फटकारले. शनिवारी घडलेली घटना अंत्यत दुर्देवी असून या घटनेमुळे ज्या कुटुंबीयांवर आघात झाला नाही आणि ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले ते कधीही भरुन न येणारे आहे. या घटनेतील मृतक बालकांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. तसेच अशा घटनांची पुनर्रावृती होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ;यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री मधुकर कुकडे , आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे,श्री धनंजय दलाल , श्रीमती सरिता मदनकर , श्री यशवंत सोनकुसरे, श्री हेमंत महाकाळकर, श्री राजू सलाम, श्री रवींद्र वानखेडे, श्री आरजू मेश्राम, श्रीमती मंजुषा बुराडे, श्री उमेश ठाकरे, दुर्गा गभणे, श्री प्रदीप सुखदेवे, श्री दयानंद नखाते , श्री गणेश चौधरी, श्री गणेश बाणेवार, श्री अरुण अंबादे, श्री प्रभू फेंडर, श्री रवी लक्षणे,श्री ईश्वर कळंबे आदी पदाधिकारी तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, ज़िल्हाधिकारी श्री संदीप कदम, ज़िल्हाशल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, ज़िल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव, ज़िल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके उपस्थित होते. सचिन सावंत शेलेवाडी मंगळवेढा सोलापूर पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारच्या पहाटे लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हि वेदनादायी व मन सुन्न करणारी घटना आहे. हि घटना ज्यांच्या दुर्लक्षीतपणा व निष्काळजीपणामुळे घडली. या बाबीची सखोल चौकशी केली जात असून यातील दोषीवर निश्चित कारवाई होणार तसेच या घटनेची पुनर्रावृती होऊ नयेया बाबीची दाखल राज्य सरकार घेणार याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री उद्धव ठाकरे व राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. श्री राजेश टोपे यांच्याशी केली आहे . या घटनेला आढळणाऱ्यांची कुठलीच गय केली जाणार नाही अशीही ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी घडलेल्या घटनेचा आढावा तसेच आपदग्रस्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खा. प्रफुल पटेल हे आज रविवारी (दि-१०) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. रुग्णालयात रुग्ण सेवेच्या दृष्टीने रुग्णालयातील उणीवा, उपाययोजना आदी बाबी जाणून घेतले. या सर्व उणीवा त्वरीत दूर करण्यास सांगितले. रुग्णसेवेत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी यावेळी फटकारले. शनिवारी घडलेली घटना अंत्यत दुर्देवी असून या घटनेमुळे ज्या कुटुंबीयांवर आघात झाला नाही आणि ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले ते कधीही भरुन न येणारे आहे. या घटनेतील मृतक बालकांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. तसेच अशा घटनांची पुनर्रावृती होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ;यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री मधुकर कुकडे , आमदार श्री राजुभाऊ कारेमोरे,श्री धनंजय दलाल , श्रीमती सरिता मदनकर , श्री यशवंत सोनकुसरे, श्री हेमंत महाकाळकर, श्री राजू सलाम, श्री रवींद्र वानखेडे, श्री आरजू मेश्राम, श्रीमती मंजुषा बुराडे, श्री उमेश ठाकरे, दुर्गा गभणे, श्री प्रदीप सुखदेवे, श्री दयानंद नखाते , श्री गणेश चौधरी, श्री गणेश बाणेवार, श्री अरुण अंबादे, श्री प्रभू फेंडर, श्री रवी लक्षणे,श्री ईश्वर कळंबे आदी पदाधिकारी तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, ज़िल्हाधिकारी श्री संदीप कदम, ज़िल्हाशल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, ज़िल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव, ज़िल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके उपस्थित होते.
सचिन सावंत शेलेवाडी
मंगळवेढा सोलापूर
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क