कोंढाळी परिसरात विविध तीन अपघातात 2 ठार 4 जखमी
कोंढाळी वार्ताहार
कोंढाळी परिसरात 24 तासात विविध तीन अपघातात दोन ठार तर चार गँभीर जखमी झाल्याची घटना घडली 11 जानेवारीला 3 की मी अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावरील चमेली गावानजीक शेतकरी नामदेव जंगलुजी सोनवणे 75 हे सायंकाळी पत्नीसह शेतातून घरी येत असताना भरधाव मोटरसाईकलने धडक दिली असता गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ अश्विनी दातीर यांनी उपचार करून नागपूर येथे उपचार दरम्यान आज नामदेव सोनवणे यांचा मृत्यू झाला ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी मोटारसायकल चॉकविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करीत आहे
तर दुसऱ्या घटनेत महामार्गावरील राजकमल हॉटेल समोरील मसाळा टी पॉईंट अपघातासाठी कुख्यात असलेल्या जागी आज दुपारी 1 वाजता दरम्यान कोंढाळीवरून घुबळी गावी मोटरसाईकलने क्र MH40 BQ 2540 ने जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील राजकमल हॉटेल नजिक मसाळा वळण टी पॉईंट वरून रस्त्यावर जात असताना नागपूरवरून अमरावतीकडे येणाऱ्या महिंद्रा मॅजिक क्र MH27 BX 4864 टेम्पोने धडक दिली असता दुचाकी चालक गंभिर जखमी व मागे बसलेल्याचा जागीच मृत्यु झाला
तर दुचाकी चालक गंभिर जखमी झाला.
कोंढाळी कडून भरवाव वेगात मसाळा गांवा कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 40 बि क्यु 2540 ला नागपूर कडून अमरावती कडे भरधाव वेगात रिकाम्या जाणाऱ्यां पिक अप क्रमांक एम एच 27 बि एक्स 4864 ने जबर धडक दिली .या अपघातात डोक्यांला मार लागून दुचाकी वर मागे बसलेल्या संदिप चंपतराव कोहळे 23 रा. गौराळा तालुका हिंगणा यांचा जागीच मृत्यु झाला तर दुचाकी चालक नितेश ईश्वर उईके 30 रा.घुबडी तालुका काटोल हा गंभिर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी चे ठाणेदार विश्वास फुल्लरवार,उप निरीक्षक राम ढगे हे.कॉ सुनिल बंसोड पोलीस नायक धारपुरे,सुनिल मोकळे, सुखदेव धुळधुळे मेजर किशोर बोबडे तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी गंभिर जखमी दुचाकी चालक नितेश उईके 30 याला खाजगी वाहनाने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आनले कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.अश्विनी दातीर यांनी प्राथमिक उपचार करुन गंभिर जखमी अवस्थेत नागपूर वैद्यकिय महाविद्यालय येथे रेफर केले कोंढाळी पोलीसांनी पिक अप चालक सुनिल तुकाराम पारवे 27 रा.खारवा जिल्हा अमरावती यांच्या विरूद अपघाताचा गुन्हा नोंदवुन अटक केली आहे…
तर तिसऱ्या अपघातात येथून 2 की मी अंतरावरील बिहालगोदी शिवारात 4;30 वाजताच्या दरम्यान दोन युवक सोंनपूरवरून जेवण करून दुधाळा येथे परत येत असताना मोटारसायकल क्र MH40BY3161 ने कोंढाळी वरून मोटारसायकल क्र MH31 BA1804 ने शेतकरी सुरेश बळीराम ठाकरे याची जोरदार आमने सामने धडकझाल्यामुळे दोन्ही बाईकचे नुकसान झाले दोन्ही बाईक चालकासह गंभीर जखमी झाले जखमीसुरेश ठाकरे व जखमी सौरभ अरुण टेकाम 16 व तुषार अरुण हिंगणकर यांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करन्यात आले असून तिन्ही अपघाताचा पंचनामा करून ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलीस करीत आहे.