महाराष्ट्र

आदिवासी जमाती व्यवसाय अर्थसहाय्य हक्कासाठी लढणार.

Summary

जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- आदिवासी जमाती व्यवसाय अर्थसहाय्य हक्कासाठी लढणार हकक न मिळाल्यास संपूर्ण जील्हातील आदिवासी “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ”चंद्रपूर कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. आदिवासी जमाती संपूर्ण जिल्हातील लोकांनी दिला आहे. आपल्या जिल्हात १०० ते १५० किमी.पासून आदिवासीं बांधव अर्थ […]

जिल्हा चन्द्रपुर वार्ता:- आदिवासी जमाती व्यवसाय अर्थसहाय्य हक्कासाठी लढणार हकक न मिळाल्यास संपूर्ण जील्हातील आदिवासी “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ”चंद्रपूर कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. आदिवासी जमाती संपूर्ण जिल्हातील लोकांनी दिला आहे.
आपल्या जिल्हात १०० ते १५० किमी.पासून आदिवासीं बांधव अर्थ सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी दर वर्षी कागदपत्र जमा करून फार्म भरतात परंतु गेल्या ०२ वर्षापासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही अनुसूचित जमाती चा हक्क मिळालास पाहिजे आदिवासी जमाती लोकांना नुसता कागदावर योजना दिसतात पण मिळत नाही त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे आदिवासी जमाती बहुतांश गरीब व शेतकरी वर्ग आहे. यांचा पुढे शिक्षण पूर्ण करणे अवघल असते कारण गोर गरीब शेतकरी बांधव असल्याने आर्थकदृष्टया बेकार असते.
त्यात कोवीड 19 असल्यामुळे आज त्यांचावर जीवन जगण्याचा प्रश्न पडला आहे.त्यांना कोणतेही काम मिळत नाहीत अशा वेळी काय करू शकणार आपण असा विचार मनात येत असता अर्थ सहाय्य योजनेचा लाभ व्यवस्थेसाठी सरकार प्रयत्न करावा असा इशाराही वर्तमान पत्राद्वारे हजारो लोक उपस्थित राहणार आहेत असा इशाराही
विद्यार्थी सेना ठरवलेली आहे.
सहाय्यक जिल्हाधकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प ”चंद्रपूर .यांना निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

तालुका प्रतनिधी.
दिपक पेन्दोर.
तालुका गोंडपिपरी
जिल्हा चंद्रपूर
+91 90229 05276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *