BREAKING NEWS:

मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

भंडारा पोलिसांचा ‘महा-स्ट्राईक’; पवनी ते लाखांदूरपर्यंत अवैध धंद्यांचे रॅकेट उध्वस्त!

सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; ८२० किलो सडवा मोहाफास अन् दारू साठ्यावर पोलिसांचा ‘बुलडोझर’! ​भंडारा…

ठाणे महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

ठाणे दि.15 (जिमाका) : कोरोनाची दुसरी लाट योग्य पध्दतीने हाताळल्याने, आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महापौर नरेश मस्के, आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,,मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ,ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा,अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना श्री.शिंदे म्हणाले की,जिल्हा प्रशासन खुप चागंल्या प्रकारे काम करत आहे.कोरोनाची लढाई सर्वानी जीव धोक्यात घालून काम केले आहे.जे अधिकरी व कर्मचारी कोरोनाची लढाई लढताना शहिद झाले आहेत त्यांना सरकारनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांसाठी सिडको मध्ये 4500 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आल्यामुळे 30 शिवभोजन केंद् चालू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दती सोडून नवीन आधुनिक पध्दतीचा स्वीकार केला पाहिजे. कोकणात मुसळधार पावसामुळे जी आपत्ती आली होती. त्याच्या मदतीसाठी ठाणे महानगरपालिका,आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य महत्त्वाचे योगदान दिले आहे.यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी, संस्था यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे, ठाणे महानगरपालिका,आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य केल्याबदल जवान, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद,ठाणे यांचे मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या मुली व महिलांचा ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना जिल्हा स्तरावर महाआवास अभियान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आले. कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत. पुढील काळात प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला पाहिजे.कोरानाची दुसरी लाट जरी नियंत्रणात असली तरी संकट टळलेलं नाही जनतेने या सर्व कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोना योद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

जिल्ह्याचा विविध क्षेत्रात सर्वांगीण विकास – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 15:- (जिमाका) :- ‍ई-पीक पाहणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, पाणी पुरवठा प्रकल्प योजना, अशा सर्व उपकमांची जिल्ह्यात…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन • कोरोनायोद्ध्यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे केली चौकशी

अनेकांचे बलिदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुया, स्वातंत्र्याचे मूल्य जपुया मुंबई, दि. १५ : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

दिव्यांगांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 05 : दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी…