लोकनेते स्व. गणेश दौड यांना अभिवादन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.1, लोकनेते स्व. गणेश ( मामा ) दौड यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे तसेच शहरातील लोकनेते गणेश दौड चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते स्व. गणेश दौड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दिवंगत गणेश मामा दौड हे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे, युवकांचे मार्गदर्शक तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. शेतकरी, व सर्व सामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली. गणेश मामा दौड सारखा लोकनेता पुनः होणे नाही असे प्रतिपादन युवानेते अब्दुल समीर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, दत्ता शेजुळ, राजू शेजुळ, गिरीश दौड,संजय मुरकुटे आदिंची उपस्थिती होती.(शेख चांद पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क सिल्लोड )