महाराष्ट्र हेडलाइन

आता कोविड १९च्या तिसर्या लाटेशी सामना सर्वांनी जागरुक राहण्याची गरज

Summary

समीर उमप दि.२७मे व ३० मे व १ जुन ला कोवीड च्या ३ री लाटे बाबत आपण जागृत रहा यासाठी गावात जावुन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी.प.स.उपसभापती सौ.अनुराधा ताई अनुप खराडे,ग. वि. अ. संजय पाटील , उपविभागीय कृषी अधिकारी विजय […]

समीर उमप
दि.२७मे व ३० मे व १ जुन ला कोवीड च्या ३ री लाटे बाबत आपण जागृत रहा यासाठी गावात जावुन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी.प.स.उपसभापती सौ.अनुराधा ताई अनुप खराडे,ग. वि. अ. संजय पाटील , उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे,नायब तहसीलदार राजेंद्र जंवजाळ सर्व सरपंच सदस्य अंगनवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक,ग्रामसेवक,तलाठी नागरीक* यांच्या उपस्थितीत डोंगरगाव, गोंन्ही(चिखली),सोनोली,तपणी तसेच आज दि.30 मे ला ग्रा.प. येनवा, गोंडी दीग्रस, खामली, राजणी,मुकणी(डोरली) व १ जुन या *गावांना जाऊन भेट देण्यात आली.त्यावेळी गावांना भेट देऊन कोविड विषयी माहिती दि.१ जुन रोजी वाढोणा,येरला(धोटे),दिग्रस( बु),वंडली( खु),मसली,कलंभा या गावी लसिकरणाबाबत आकडेवारी घेण्यात आली. तसेच ज्या लोकांचे लसीकरण व्हायचे राहले आहे त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि ग्रां.प.मधे बोलावून त्यांच्या शंकाचे निराकरण करण्यात आले.तसेच यानंतर *समोरील व्यक्त करण्यात आलेल्या कोविड च्या 3 ऱ्या लाटेबाबत आपल्याला आणखी काय उपाय योजना करता येतील त्याविषयी माहिती प्रोजेक्टर वर दाखवण्यात आली.आणि त्यासंबंधी चे निर्देश ग्रा.प. ना देण्यात आले त्यावेळी या पाहणीत असे आढळून आले की ग्रामीण भागातील पॉसिटिव लोकांचे प्रमाण खूप कमी झाले आहे ही एक समाधानकारक बाब समोर आली.तसेच आता जनतेला या महामारी विषयी स्वतः जागरूक राहून आणि सर्वांनी सोबत प्रयत्न करून या महामारीला सामोरे जाऊ असा विश्वास व्यक्त करण्यात आला.तसेच ग्रा.प. येनवा,गोंडी दिग्रस, राजनी,आणि डोरलि (भा.) या गावामध्ये शौच खड्ड्यांचे भूमिपूजन करण्यात आले.पाण्याची गरज लक्षात घेता आणि जमिनीची क्षमता वाढावी तसेच रस्त्यावरून सांडपाणी वाहून जाणार नाही आणि दुर्गंधी सुद्धा होणार नाही त्याकरिता शासनाने अनुदान तत्वावर नरेगा अंतर्गत शौच खड्ड्यांची योजना सुरू केली आहे.त्याचा वापर आणि शौच खड्डे तयार करण्याकरिता सर्व ग्रा.प. व संबधित लोकांना मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *