महाराष्ट्र हेडलाइन

पारशिवनी ग्रा. रूग्णालय व प्राथमिक आ. केंद्र वैद्यकीय अधिका-यांना औषधी, साहित्य सुपुर्द

Summary

कन्हान : – पंतप्रधान मा नरेंद्र मोदी च्या नेतुत्वात भाजपा महायुती केंद्र सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याचे औचित्य साधुन खासदार मा. विकासजी महात्मे यांनी आषुष मंत्रालय भारत सरकार व्दारे पारशिवनी ये़थील ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकी य अधिकारी, […]

कन्हान : – पंतप्रधान मा नरेंद्र मोदी च्या नेतुत्वात भाजपा महायुती केंद्र सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याचे औचित्य साधुन खासदार मा. विकासजी महात्मे यांनी आषुष मंत्रालय भारत सरकार व्दारे पारशिवनी ये़थील ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकी य अधिकारी, डॉक्टर, आशा वर्कस यांना औषधी व साहित्य सुपुर्द करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वा त भाजपा महायुतीच्या केंद्र सरकारला आज ७ वर्षे पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने ‘सेवा हीच संघटना’ हा भाज पाचा मुलमंत्र लक्षात घेऊन पारशिवनी तालुक्यात ‘सेवाकार्य दिन’ या पार्श्वभुमीवर पारशिवनी शहरातील ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास खासदा र मा. विकासजी महात्मे हयांनी रितसर पाहणी करून आयुष मंत्रालय, भारत सरकार तर्फे ५ जम्बो ऑक्सि जन सिलेंडर, ५० पल्स ऑक्सिमिटर, ५० ग्लुको मीटर तसेच केन्द्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद,(सीसीआरएएस)चे डॉ. श्री. आर गोविंद रेड्डी यांच्या माध्यमातुन स्वास्थ विभाग भारत सरकार मान्य आयुष्य-६४ औषधी ही आरोग्य अधिकारी पारशिवनी तालुका, प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी आणि आशा वर्कर्स यांना सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी खासदा र मा. विकासजी महात्मे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश वांढे, तालुकाध्यक्ष अतुलभाऊ हजारे, रामभाऊ दिवटे, अशोक कुथे, सौ.रेखा दुनेदार, अमिश रुंघे, प्रतीक वैद्य, सागर सायरे, राजु भोयर, मनोज गिरी, परसराम राऊत, डॉ.भड, सौरभ पोटभरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *