अबब! मे महिन्यात दहा लाख नागरिकांना कोरोनाची बाधा तर १९ हजार रुग्ण दगावले.

मुंबई:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ३० मे २०२१
कोरोना विषाणूची दुसरी लहर अतिशय गतीने महाराष्ट्रात घुसली आहे. तीने महाराष्ट्रातील १९,००० व्यक्तींचा बळी घेतला आहे. तर साधारणपणे १० लाख व्यक्तींना बाधित करून त्यांच्या जीवाशी खेळत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात कोरोना विषाणूचे संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सतत वाढत आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती अजून ही भयानक आहे. महाराष्ट्रामध्ये शनिवारी कोरोना विषाणूचे २०,२९५ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ४४३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.
अशा पद्धतीने राज्यात एकूण संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या ५७,१३,२१५ एवढी झालेली आहे. आज अखेर मयत झालेल्या कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या ९४,०३० एवढी भयानक वाढली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३१,९६४ रुग्णांना शनिवारी उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. ज्यामुळे कोरोणामुक्त झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या ५३,३९,८३८ एवढी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या उपचार घेत असणाऱ्या एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या २,७६,५७३ एवढी आहे. आज २,५८,७९९ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आज पर्यंत ३,४६,०८,९८५ व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली