लता मंगेशकर हॉस्पिटल काटोल येथे 54 रक्तदात्यांनी केले रक्तदान

काटोल-संवाददाता दुर्गाप्रसाद पांडे
लता मंगेशकर हॉस्पिटल काटोल येथे लोकनेते मा. श्री रणजितबाबू देशमुख यांच्या 75 व्या वाढदिवसा निमीत्त दिनांक 29 मे 2021 ला भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
कोरोनाच्या या महामारी मध्ये महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे लता मंगेशकर हॉस्पिटल मधे *54* रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.
या शिबिर प्रसंगी लता मंगेशकर हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर ढोबळे, डॉ. भावना जेवडे, डॉ. रुपल दरक डॉ. मृणाल खोब्रागडे व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.