लायन्स क्लब गडचिरोली ची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी लॉ परविन भामानी

लायन्स क्लब गडचिरोली ची सत्र 2021- 22 साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी परविन
नादिर भामानी, सचिवपदी मंजुषा दीपक मोरे, कोषाध्यक्षपदी महेश बोरेवार
तर प्रथम उपाध्यक्ष म्हणून सतीश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर यांच्या कार्यकारिणीने मागील वर्षात राबवलेले उपक्रम तसेच काही नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम नवनियुक्त अध्यक्ष लॉयन परवीन भामाणी यांनी यावर्षी राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
नवीन कार्यकारणी चे लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार,माजी अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर, घिसूलाल काबरा, विनय ढोले, इंजि. भुजंग हिरे, नादिर भामानी, डॉ. राजाभाऊ मुन घाटे, इंजि. सुरेश लडके, प्रा. शेषराव येलेकर, गिरीश कुकुडपवार, शेमदेव चाफले, शांतीलाल सेता, प्रवीण मिर्गे, मदत जीवानी,डॉ अरुण प्रकाश, दीपक मोरे, प्रभू सादमवार, रहीम डोलिया, संजय बारापात्रे, प्रा. संजय भांडारकर, प्रा. देवानंद कामडी ,छायाताई पद्मावार,योगिता पिपरे, सुधा सेता, स्मिता लडके, नवीन भाई उनाडकाट, सुनील देशमुख, सुचिता कामडी, सविता साधमवार, मनोज ठाकूर,महेश काबरा, योगानंद उईके,शालिनी कुमरे, किशोर चीलमवार,आदींनी अभिनंदन केले आहे.
प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी