सिल्लोड पोलिसांची सावध भूमिका

सिल्लोड( प्रतिनिधी) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेबांनी ब्रेक चेन च्या नावाने जे लॉक डाऊन केला आहे त्यामध्ये १५ मे ते ०१ जून या दरम्यान लॉक डाऊन व शनिवार रविवारी कडक लॉक डाऊन केलेला आहे सोमवार ते शुक्रवार भाजीपाला न सकाळी०७ ते ११ च्या दरम्यान सूट दिलेली आहे शनिवारी व रविवारी कुणाला पण दुकान उघडण्याचे परवानगी नाही तरीपण काही लोक मार्केटमध्ये मोकाट फिरताना दिसत आहेत तरी सिल्लोड शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल मोकळे पोलिस हेडकॉन्स्टेबल तळेकर व होमगार्ड वाघ यांनी लोकांना समजावून घरी पाठवले ज्यांना काम आहेत त्यांना सोडले जे लोक रिकामे फिरत आहेत त्यांना घरी पाठवले आहे दरम्यान २ जून नंतर नवीन नियमावली जाहीर होईल परंतु कोरोना प्रादुर्भ झपाट्याने कमी होत असल्यामुळे पुढच्या महिन्यात काही तरी दिलासा मिळेल अशी आशा आहे एकीकडे जालना मध्ये पोलिसांनी मारहाणीचा व्हिडिओ मीडियामध्ये व्हायरल होत असताना सिल्लोडमध्ये मात्र पोलिसांची सावध भूमिका दिसायला मिळाली