अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र; काय म्हणाले आंबेडकर …..
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१:- कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली असून विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २८ मे. २०२१:-
कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली असून विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला ??मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. हे सरकार म्हणजे सह्याजीराव झाले आहे.
मोदींनी ओढवून घेतलेले संकट :- पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला पराभूत करण्यासाठी कोविड-१९ ची दुसरी लाट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओढून घेतलेले संकट असल्याचा आरोप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
*मनुष्यवधाचा गुन्हा :* अनेकांना रुग्णालयात बेड मिळाले नाही, ऑक्सिजन मिळाले नाही, यामुळे अनेक जण दगावले. असा आरोप करत, हरगर्जी पणा केल्यामुळे मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. असा इशारा नेते प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला.
सल्ला ? कोविड सेंटर म्हणून उभं करत असलेली संकल्पना बंद करून प्रत्येक हॉस्पिटलला कोविड रुग्ण तपासण्याची परवानगी दिली पाहिजे, किंवा सक्ती केली पाहिजे. जे हॉस्पिटल करणार नाहीत त्याच लायसन्स रद्द केलं पाहिजे. फडणवीसांनी पत्र लिहण्याच्या भानगडी करीत राज्यभर वनवन फिरण्यापेक्षा त्यांनी नागपुरातच बसावे. तेथे एक-दोन कोविड सेंटर सुरू करून नागपुरकरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. लसींच्या तुटवड्याचे कारण ??मोदी सरकारने आपल्या देशात लसीकरणाची नोंदणी उशिरा सुरू केली. म्हणून लसीचा तुटवडा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त इव्हेंटमध्ये रस आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपात्कालीन समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील. लस घेण्यामागील कारण ? कोरोना संकटात वंचित बहुजन आघाडीचे १२ कार्यकर्त्यांचे बळी गेले. मी मानत नाही, पाळत नाही म्हणून कार्यकर्तेही कोरोनाला मानत नाही, हे लक्षात आले. त्यांची सुरक्षा महत्त्वाची. मी लस घेतली तर कार्यकर्तेही घेतील, या उद्देशाने मी कोविड-१९ ची लस घेतली. दरम्यान, कार्यकर्ते व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही यावेळी आंबेडकरांनी केले. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वीच सरकारने नियोजनबद्ध आखणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.