तारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौक येथे कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या सहकार्याने मोबाईल बुथ मोहीम राबवुन अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची कोव्हीड-१९ अँटीजेन तपासणी करण्यात आली.
गुरूवार (दि.२७) व (दि.२८) मे ला कन्हान पोलीस स्टेशन थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांचे सहकार्याने मोबाईल बुथ मोही म राबवुन तारसा रोड चौक कन्हान येथे अनावश्यक फिरणा-या (दि.२७) ला २८ व (दि.२८) मे ला ३६ अश्या ६४ लोकांची कोव्हीड-१९ अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आढळुन आले. सदर मोहीम ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ योगेश चौधरी, तांत्रिक सहाय्यक श्वेता मेश्राम, आरोग्य सहा य्यक सुरेंद्र गि-हे, अजय राऊत, चालक गौरव भोयर, पोस्टे कन्हान चे पोहवा जयलाल सहारे, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि विरेंद्रसिंह चौधरी, मुकेश जैस्वाल आदीने यशस्विरित्या पार पाडली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क