भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित बांधकामाचा मार्ग हाेणार सुकर. *भंडारा बाहय वळण मार्ग दुसरा टप्पा व तुमसर बाहय वळण रास्ता बाधकाम व अनेक विषयावर चर्चा : मा. मंत्री अशोक चव्हाण, मा. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित मंत्रालयात बैठक
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25 मे. 2021:- भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध बांधकामांमधील अडथळे दूर करुन या बांधकामाना त्वरित सुरुवात करण्यात यावी यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) मुंबई मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25 मे. 2021:-
भंडारा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध बांधकामांमधील अडथळे दूर करुन या बांधकामाना त्वरित सुरुवात करण्यात यावी यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) मुंबई मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील बाहय वळण मार्ग आणि रस्ते बांधकामाच्या विषयावर चर्चा या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित बांधकामाचा मार्ग सुकर होणार आहे.
मुंबई मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग मंडळ, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच या विभागांचे सचिव उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात भंडारा बाहय वळण मार्ग दुसरा टप्पा व्हाईट टॉपिग करणे ,तुमसर बाहय वळण रास्ता बाधकाम करणे ,लाखनी तालुक्यातील पालांदूर बायपास अड्याळ ,दिघोरी राज्य मार्ग ते पालांदूर ढिवरखेडा वाकळ रस्त्याला खाजगी जमीनीचे भूसंपादन करणे ,भंडारा जिल्ह्याधिकारी कार्यालयाचे प्रशासकीय इमारत बांधकाम करणे , भंडारा शासकीय विश्रामगृहच्या विस्तारीकरण करणे , लाखनी तालुक्यातील परसोडी बाहय वळण मार्गाचे भूसंपादन करणे , तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवरील नाकाडोगरी येथील पुलाचे सक्षमीकरण करणे , माडगी – वांगी- वाहिनी – सिलेगाव- सिहोरा- मांगली- टेमनी रस्त्याचे मजबुतीकरण व डाबरीकरण करणे , मुरली – चांदपूर रस्त्याचे मजबुतीकरण व डाबरीकरण करणे आदी विषयांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या बांधकामातील अडथळे दूर करुन या बांधकामांना गती देण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे नुतनीकरण व भंडारा शासकीय विश्रामगृहच्या विस्तारीकरण*
मंगळवारी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे नुतनीकरण व भंडारा शासकीय विश्रामगृहच्या विस्तारीकरण करणे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुध्दा अडचणी दूर करुन बांधकामाला गती देण्यास सांगितले.