राज्य शासनाची धान खरेदीची घोषणा ही निव्वळ फसवी योजना – खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरण वाघमारे सह शेतकऱ्यांना अटक शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा,निर्णय होईपर्यंत सुरूच राहणार.
भंडारा,
भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र १ मे पासून सुरू करणे निश्चित असताना आज पर्यंत धान खरेदी ला सुरुवात झालेली नाही. तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, खरीप धान खरेदीचा बोनस देण्यात यावा, खरीप हंगामात ३१ मार्च पूर्वी सातबारा ऑनलाइन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची खरेदी केलेले खरेदी करण्यात यावे आणि ३० जून पर्यंत धानाची खरेदी असताना ऑनलाईन सातबारा झालेल्या शेतकऱ्यांची उन्हाळी धान खरेदी करणे बंधनकारक राहणार नाही ही टाकलेली अट शिथिल करावी व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने खापा चौक, खापा तहसील तुमसर येथील राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दिनांक २० मे २०21 ला तहसीलदार तुमसर आणि तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तुमसर विधानसभा क्षेत्रातील वस्तुस्थिती कळवून शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी निवेदन देऊन रास्त मागण्या पूर्ण न झाल्यास तीन दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे देखील कळविण्यात आले होते. म्हणून २४ मे २०२१ ला सकाळी दहा वाजता तुमसर मोहाडी तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी स्वयंस्फूर्तपणे गोळा होत होते.
आंदोलनाला भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, जिल्हा पणन अधिकारी श्री.खर्चे, श्री. हेडाऊ, उपविभागीय अधिकारी तुमसर श्री टेळे, ना. त. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.बिसेन, सहाय्यक पोलीस श्री. पवार, जिल्हाध्यक्ष भाजपा श्री. शिवरामजी गिरेपुंजे, मो. तारिक कुरेशी यांच्यात झालेल्या बैठकीत धक्कादायक माहिती पुढे आली
१. जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र एकूण 38 चे उद्घाटन झालेले असून त्यात प्रत्यक्ष एकही क्विंटल धान खरेदी झालेली नाही.
२. जिथे धान खरेदी केंद्र सुरुवात करण्यात आले तिथे धान्यसाठा करण्यासाठी कोणताच गोदाम उपलब्ध नाही.
३. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या बोनस संदर्भातील घोषणा म्हणजे जनतेची फसवणूक असून आजपर्यंत खरिप बोनस बाबत एकही रुपये दंड प्राप्त झाले नाही.
४. 31 मार्च अखेर शिल्लक धान बाबत वेबसाईट बंद असल्याने व मुदतवाढ नसल्याने यंदा खरेदी होऊ शकली नाही. असे लेखी पत्र जिल्हा पणन अधिकारी यांनी दिले
चरण भाऊ वाघमारे यांनी जिल्ह्याची धान खरेदी संबंधी भयानक वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली
या रास्ता रोको आंदोलनात राज्य सरकारमध्ये घटक पक्ष असलेले तीघाडी महाविकास आघाडी सरकारने सत्ता पक्षाचे नेते इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया वृत्तपत्राचे द्वारे जिल्ह्यातील जनतेला मृगजळ दाखविण्याचा काम करीत आहेत जनतेला अजूनही निवडणूक असल्यासारखे खोटे आश्वासन देत आहेत लोकडाऊन मध्ये शेतकरी राजा अनेक अस्मानी-सुलतानी, मानवनिर्मित संकटाचा सामना करीत असताना राज्य सरकार कडून देखील सापत्नीक वागणूक देत बारमालक, मोठे उद्योजक यांना सवलती देऊन भूमिपुत्र शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा धान विकण्याचा केंद्र शासनाने दिलेला अधिकारावर अतिक्रमण करून धान खरेदी केंद्र विहित वेळेत सुरू न करता जाहीर केलेल्या खरिपाचा धानाचा बोनस अडचणीच्या काळातही वाटप न करता केवळ ऑनलाईन सातबारा करून धान मोजण्याचा शासन निर्णय काढला ही शेतकऱ्यांची थट्टा मांडून त्याच्या अधिकाराचा हनन करीत असल्याने नाईलाजाने याप्रसंगी राज्य शासनाचे विरोधात शेतकरी हितार्थ रस्त्यावर भाजीपाला भाजपाला उतरावे लागले असून या आंदोलनात शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून मिळालेली माहिती ही खूपच भीषण वास्तव समोर आणणारी आहे या महाबिघाडी सरकारने तत्काळ चूक सुधारून जगाचा पोशिंदा ला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन पेटवू असे आवाहन खासदार सुनील मेंढे, माजी आमदार चरण वाघमारे, यांनी दिले यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी सभापती म्हाडा नागपूर मो.तारीख कुरेशी, युवराज जमाईवार, हिरालाल रोटके, ललित शुकला, अनिल जीभकाटे, हंसराज आगासे, राजेश पटले भाऊराव तुमसरे, मयुरध्वज गौतम,कैलास पडोळे, कल्याणी भुरे,सुनील लांजेवार, हरिश्चंद्र बंधाटे, महेतबसिंग ठाकूर, चंदू पिलारे, कांती ढेंगे, परमेश नलगोपुलवार,बालचंद पाटील,किशोर भैरम, विश्वनाथ कुकडे ,रमेश हलमारे,उमेश पाटील, शंकर आचरकटे,नरेंद्र भोयर,अशोक परतेती, रवींद्र बाभरे,जगदीश पंचभाई, राधेश्याम बांडेबूचे, शांताराम आकरे, महेश कळंबे,मधू पटले, गुरू सेलोकर,सुरेश बसिने, अंकुश दमाहे, गणेश हिंगे,शालीक पंधरे, पवन वाघमारे, दिगंबर कुकडे,भाऊराव बुद्धे, ओम तिबुडे,भाऊलाल बांडेबूचे, राजेश सेलोकर,मंगेश मानापुरे, राजकुमारी लीलहारे,रामदास हलमारे,पिंटू सिंग,दिलीप सार्वे, परमानंद कटरे, विकास बिसने, गोपाळ येळे, डॉ अशोक पटले,सतीश चौधरी,डॉ मुरलीधर बानेवार, बंडू बनकर,नंदू रहांगडाले, अविनाश उपरिकर,अनिल पांडे,धनराज आगासे,राजू गायधने, नागेश धार्मीक, सचिन बोपचे,शोभाताई लांजेवार, रिनाताई माटे, सोनूताई तरारे,पंकज राठोड, सागर बिसने,मोहित मेश्राम,बालचंद बोन्द्रे, नावेद शेख,आकाश कनोजे,आणि शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते