लॉकडाऊन चे नियम तोडून विवाह करीत असलेल्या वधु पित्यावर 50 हजार रुपये दंड ? नगर परिषद आरमोरी व तहसील कार्यालय आरमोरी ची संयुक्त कार्यवाही

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 23 मे. 2021
आज दिनांक 20 मे 2021 ला मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री.संतोषसिंग रंजितसिंग जुनी रा.शास्त्रीनगर BSNL टॉवर , आरमोरी यांचे मुलीचे विवाहात 200 लोकांचे वर लोक असून विवाह होत आहे अशी माहिती मिळताच नगर परिषद व तहसील कार्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौका चौकशी केली असता सदर विवाहात 200 चे वर लोक आढळुन आले . श्री.संतोषसिंग जुनी यांनी लकडाऊन चे नियम तोडून विवाह करीत असल्यामुळे त्यांच्यावर 50 हजार रुपये दंड बसविण्यात आला या कार्यवाही प्रसंगी श्री.संजय राठोड नायब तहसीलदार, .डॉ.माधुरी सलामे मुख्याधिकारी , श्री.नितिन जा.गौरखेडे स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता ,,श्री.पी.जी.गजभिये तलाठी , श्री.संदीप तुपट महसूल सहाय्यक, श्री.प्रशांत भैसारे महसूल सहाय्यक , श्री.राजु कांबळे लिपिक , श्री.मोहन कांबळे लिपिक , श्री.सुधीर सेलोकर लिपिक , श्री.मंगेश चीचघरे शिपाई इत्यादी च्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली.