ग्रामीण रुग्णालय लाखनी आणि लाखांदुरला प्रत्येकी १ अद्ययावत रुग्नवाहिका. मा. नानाभाऊ पटोले यांनी स्थानिक विकास निधीतुन दिले 50 लक्ष रुपये.

गोंदिया :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 22 मे. 2021
आपल्या देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत आहे आणि या परिस्थितीशी तोंड देण्याकरिता आपल्याला विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यापैकी एक महत्वाची सुविधा म्हणजे रुग्णवाहिका. रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आणि म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. नानाभाऊ पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 50 लाख रुपये एवढी रक्कम रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी दिलेली आहे. लवकरच ग्रामीण रुग्णालय लाखनी आणि ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे अद्ययावत बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टिम असलेल्या रुग्णवाहिका दाखल होतील. यापूर्वी देखील मा. नानाभाऊ पटोले यांनी लाखांदूर आणि लाखनी येथे प्रत्येकी एक एक रुग्णवाहिका दिलेली आहे मात्र त्या दोन रुग्णवाहिका असतानादेखील आणखी गरज लक्षात घेता पुन्हा दोन रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय लाखनी आणि लाखांदूरला दिलेल्या आहेत, यामुळे रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे. कोरोनाचं संकट हे गंभीर असलं तरी आपण पूर्ण ताकदीने त्याच्या सामना करूया, शासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करूया आणि कोरोनाला हद्दपार करूया मात्र हे सगळं करत असताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कोरोना संबंधित कुठलीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा तसेच आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.