आज गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरुन रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात.

गोंदिया :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 21 मे. 2021
कालपासुन विविध केंद्रावरुन खरेदीला सुरुवात झाल्याने रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आमगांव तालुका बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था मर्या. आमगाव व्दारा केंद्र रिसामा, खरेदी केंद्राचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते व मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांच्या उपस्थितीत धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी खा. प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात धान खरेदी सुरु करण्याचे आश्वासन खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले होते.त्यानुसार गुरुवारपासून धान खरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पुर्तत: झाली आहे.जसे जसे गोदाम उपलब्ध होतील तस तसे धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. दरम्यान रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी सर्वश्री विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, कमलबापु बहेकार, सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, बिसने साहेब ADMO, गोंडाणे साहेब ADMO, बाबुलाल बोपचे, टिकाराम मेंढे, भृगलास्तव आशिषभाऊ भुतडा, अजय भुतडा, अजय कोठारी,सुभाष यावलकर, नामदेव दोनोडे, नामदेव पागोटे, तुकडोजी रहांगडाले, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, श्रीखंडे सर, वंजारी सर, वासुदेव डोये, संचालक मंडळ व बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते याप्रसंगी उपस्थितांनी खा. प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.