महाराष्ट्र हेडलाइन

खमनचेरु येथे उपसरपंच पदावर नितीन कोडापे यांची बनविरोध निवड ! — जिल्हा अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देवून केले स्वागत !

Summary

गडचिरोली : विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 16 मे. 2021:- अहेरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी महीन्यात पार पडल्या आणि सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली होती. अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत खमनचेरू येते आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार […]

गडचिरोली : विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 16 मे. 2021:-
अहेरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत निवडणूक फेब्रुवारी महीन्यात पार पडल्या आणि सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली होती. अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत खमनचेरू येते आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री. दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष . अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत खमनचेरू येते सरपंच व उपसरपंच आविसचे होते.
मात्र उपसरपंच . साईनाथ कुक्कुटकर यांच्यावार अतिक्रमण केले असल्याचे ठपका ठेवून तक्रार दाखल करण्यात आले असल्याने त्यांच सदस्यत्व रद्ध झाले. त्यामुळे उपसरपंच पदाची आज निवडनूक पार पाडली.
या निवडनूकीत आविसचे . नितीन कोडापे यांच्या उपसरपंच म्हणून निवड झाली. त्यामुळे आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छा देवून स्वागत करण्यात आले. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य . अजय नैताम, जि. प. सदस्या सुनीता कुसनाके, ग्राम पंचायत सरपंच शैलू मडावी, सदस्या शामा बारसागडे, जिवनकला आलाम, राजेश्री डोंगरे, कलावती कोडापे, प्रशांत गोडसेलवार आदि उपस्थित होते. तर पीठासिन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार . फारुख व आत्राम तसेच सचिव कु. एस. गेंडाम होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *