युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते गरजूंना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.9, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब गरजूंना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप सुरू आहे. शुक्रवार ( दि.8 ) रोजी युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते अंधारी सर्कल मध्ये गरजूंना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि. प.माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे संचालक सुनील पाटणी, माजी उपसरपंच अब्दुल रहीम, राजू पाटणी , वाहेद पटेल, बाळू गोरे, पोपट तायडे, विठ्ठल तायडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात 40 हजार गरजूंना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. शिवसैनिकांच्या माध्यमातून घरपोच ही मदत पोहचविण्यात येत आहे. शुक्रवार रोजी युवानेते अब्दुल समीर यांनी या उपक्रमाचा ग्रामीण भागात जावून आढावा घेतला. तालुक्यातील जवळपास 80 टक्के गावात गरजूंना मदत पोहचविण्यात आली असून उर्वरित गावांमध्ये येत्या 3 दिवसांत शिवसेनेची मदत पोहचेल अशी माहिती युवानेते अब्दुल समीर यांनी याप्रसंगी दिली.
——————————————–
शेतकऱ्यांशी साधला संवाद……
खरिपाचे दिवस जवळ आल्याने शेतकरी मशागतीचीच्या कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर युवानेते अब्दुल समीर यांनी अंधारी परिसरातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेवून पीक लागवड करावी, खत किंवा बियाणे चढ्या भावाने विक्री होत असेल तर त्याची माहिती कृषी विभाग व पंचायत समिती कार्यालयात द्यावी यावर निश्चित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देत होईल तो पर्यंत ठिबक सिंचन चा वापर करून ” विकेल ते पिकेल ” अंतर्गत पिकांची लागवाड करावी असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनी शेतकऱ्यांना केले.